Oppo Reno 14 Series Details : स्मार्टफोन क्षेत्रात नावाजलेली कंपनी Oppo ने आपल्या Reno 13 मालिकेतील Oppo Reno 14 आणि Reno 14 Pro हे दोन अत्याधुनिक स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केले आहेत. या दोन्ही डिव्हाइसेसने टेक्नोलॉजी प्रेमींच्या अपेक्षांना पूर्ण करणाऱ्या अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज असून भारतातही लवकरच हे स्मार्टफोन्स दाखल होणार असल्याची चर्चा आहे.
Reno 14 मध्ये MediaTek Dimensity 8350 तर Pro मॉडेलमध्ये अधिक प्रगत Dimensity 8450 चिपसेट देण्यात आला आहे.
दोन्ही फोनमध्ये 16GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 1TB UFS 3.1 स्टोरेज पर्याय आहेत.
Reno 14 मध्ये 6.59-इंच 1.5K OLED डिस्प्ले, तर Reno 14 Pro मध्ये 6.83-इंचाचा 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आहे.
3,840Hz PWM डिमिंग मुळे डोळ्यांवर ताण न येता सहज ब्राउझिंगचा अनुभव मिळतो.
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये तीन 50MP कॅमेरे देण्यात आले आहेत. मुख्य सेन्सर, 3.5x झूमसह पेरिस्कोप लेन्स, आणि सेल्फीसाठी 50MP कॅमेरा.
Pro मॉडेलमध्ये 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला असून, बेस मॉडेलमध्ये तो 8MP अल्ट्रा-वाइड आहे.
Reno 14 मध्ये 6,000mAh तर Pro मध्ये 6,200mAh क्षमतेची बॅटरी आहे.
दोन्ही फोन 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात, तर Pro मॉडेलमध्ये 50W वायरलेस AIRVOOC चार्जिंग देखील उपलब्ध आहे.
नवीन दोन्ही फोन्स Android 15 बेस्ड ColorOS 15 वर चालतात.
IP66, IP68 आणि IP69 प्रमाणपत्रामुळे पाणी आणि धूळ यांच्यापासून संरक्षण.
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, GPS, Galileo, QZSS यांसारखे अत्याधुनिक कनेक्टिव्हिटी फिचर्स.
Oppo Reno 14 5G-
12GB + 256GB – CNY 2,799 (33,200रुपये)
16GB + 256GB – CNY 2,999 (35,600 रुपये)
12GB + 512GB – CNY 3,099 (36,800 रुपये)
16GB + 512GB – CNY 3,299 (39,100 रुपये)
16GB + 1TB – CNY 3,799 (45,100 रुपये)
Oppo Reno 14 Pro 5G-
12GB + 256GB – CNY 3,499 (41,500 रुपये)
12GB + 512GB – CNY 3,799 (45,100 रुपये)
16GB + 512GB – CNY 3,999 (47,400 रुपये)
16GB + 1TB – CNY 4,499 (53,400 रुपये)
Oppo Reno 14 सिरीजने प्रीमियम मिडरेंज सेगमेंटमध्ये एंट्री घेतली असून भारतात लवकरच याची एंट्री होण्याची शक्यता आहे. उत्कृष्ट कॅमेरा, जबरदस्त बॅटरी, नवीनतम Android आणि आकर्षक डिझाइन यामुळे भारतीय ग्राहकांमध्ये या फोनची मोठी मागणी होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.