Pebble Cosmos Engage
Pebble Cosmos Engage  Sakal
विज्ञान-तंत्र

Pebble Watch: अवघ्या ४ हजारात Apple Watch Ultra सारखे घड्याळ, कॉलिंगचाही सपोर्ट; पाहा फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

Pebble Cosmos Engage Watch Details: Pebble ने भारतात आपली नवीन स्मार्टवॉच Cosmos Engage ला लाँच केले आहे. या वॉचचे डिझाइन Apple Watch Ultra सारखे आहे. Pebble ने भारतात यापूर्वीही अनेक स्वस्त स्मार्टवॉचला लाँच केले आहे. कंपनीने भारतीय बाजारात लाँच केलेल्या Pebble Cosmos Engage च्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Pebble Cosmos Engage ची किंमत

Pebble Cosmos Engage स्मार्टवॉच हुबेहुब Apple वॉच अल्ट्रा सारखी आहे. या वॉचची किंमत फक्त ३,९९९ रुपये असून, तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता.

काही दिवसांपूर्वीच कंपनीने Apple वॉच सीरिज ८ सारखी दिसणारी स्मार्टवॉच लाँच केली होती. या वॉचचे नाव पेबल फ्रॉस्ट आहे. कंपनी ग्राहकांना कमी किंमतीत प्रीमियम फीचर्स देण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Pebble Cosmos Engage चे स्पेसिफिकेशन्स

Pebble Cosmos Engage मध्ये १.९५ इंच IPS LCD डिस्प्ले देण्यात आला असून, याची पीक ब्राइटनेस ६०० निट्स आहे. यात ओलेड पॅनेल मिळत नाही. परंतु, ऑलवेज ऑन डिस्प्लेचा सपोर्ट मिळेल. वॉचला पाण्यापासून सुरक्षेसाठी आयपी६७-रेटिंग मिळाले आहे. यामध्ये अनेक स्पोर्ट्स मोडचा देखील सपोर्ट मिळतो. तसेच, हार्ट रेट मॉनिटर, स्लीप मॉनिटरिंग सारखे फीचर्स दिले आहेत.

वॉच ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह येते. Pebble Cosmos Engage ला तुम्ही ऑरेंज, स्टारलाईट, मिडनाइट ब्लॅक, सेलेस्टियल ब्लू रंगात खरेदी करू शकता. सिंगल चार्जमध्ये वॉचची बॅटरी ४ ते ५ दिवस टिकते.

हेही वाचा: Rishabh Pant: ऋषभ चालवत असलेली कार सुरक्षेच्याबाबतीत आहे अव्वल, मिळतात जबरदस्त सेफ्टी फीचर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT