विज्ञान-तंत्र

Pegasus पाळत कशी ठेवतं? महागड्या टेक्नॉलॉजीसाठी कोट्यवधींचा खर्च

सूरज यादव

पेगॅसस चर्चेत आल्यानंतर आता याचा शोध घेतला जात आहे की हे स्पायवेअर कोण खरेदी करू शकतं? याची किंमत किती असते आणि काम कसं करतं?

पेगॅससच्या माध्यमातून पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्तींवर पाळत ठेवली जात असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर देशात आता सरकारवर विरोधकांनी टीका सुरु केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज सुरु होताच चार मिनिटातच विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा स्थगित करण्यात आली. भारतातील सुमारे ४० पत्रकारावर ‘संभाव्य लक्ष्य’ म्हणून पाळत ठेवली जात असल्याचे सोमवारी स्पष्ट झाल्यानंतर याबाबतची अधिक माहिती उघड झाली आहे.

इस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’ कंपनीने तयार केलेल्या ‘पिगॅसस’ या लष्करी दर्जाच्या स्पायवेअरचा वापर पाळत ठेवण्यासाठी करण्यात आला. ही बाब पॅरिस येथील ‘फॉर्बिडन स्टोरीज’ आणि ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थांनी उघडकीस आणली. त्यांना ५० हजार मोबाईल क्रमांकाची यादीच मिळाली. त्यांनी जगभरातील इतर १६ वृत्तसंस्थांना ही बाब सांगितली. या सर्वांनी शोध घेतला असता ५० देशांमधील एक हजारहून अधिक जणांवर पाळत ठेवण्यासाठी त्यांची नावे निश्‍चित केल्याचे सिद्ध झाले. ‘एनएसओ’ने ज्यांना हे स्पायवेअर विकले होते, त्यांच्याकडूनच पाळत ठेवण्याचा प्रकार घडला असल्याचा संशय आहे. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चे पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या झाल्यानंतर चार दिवसांनंतर त्यांच्या मैत्रिणीच्या मोबाईलमध्येही हा स्पायवेअर सोडण्यात आल्याचा दावा ‘ॲम्नेस्टी’ने केला आहे.

पेगॅसस चर्चेत आल्यानंतर आता याचा शोध घेतला जात आहे की हे स्पायवेअर कोण खरेदी करू शकतं? याची किंमत किती असते आणि काम कसं करतं? एनएसओ ग्रुप फक्त अधिकृत सरकारसोबत काम करण्याचा दावा करते. पेगॅससचा सार्वजनिकरित्या मेक्सिको आणि पनामा सरकारकडून वापर केला जातो. 40 देशांमध्ये जवळपास 60 ग्राहक असून 51 टक्के इंटेलिजन्स एजन्सीज, 38 टक्के कायदे संस्था आणि 11 टक्के लष्कराशी संबंधित ग्राहक यामध्ये आहेत.

कंपनीने संकेतस्थळावर म्हटलं आहे की, एनएसओ ग्रुप सरकारी एजन्सींना स्थानिक आणि जागतिक धोक्यांची माहिती घेण्यासाठी आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी बेस्ट इन क्लास टेक्नॉलॉजी देते. आमचे प्रोडक्ट सरकारी गुप्तचर आणि कायदे संस्थांना दहशतवाद आणि गुन्हे रोखण्यासाठी, तापासात येणारे एनक्रिप्शनचे अडथळे दूर करण्यासाठी मदत करते.

पेगॅससची किंमत आणि पाळत ठेवण्याचा खर्च किती?

पेगॅसस स्पायवेअऱ हे लायसन्ससह विक्री केले जाते. याची किंमत किती असेल हे कंपनी आणि खरेदी करणाऱ्यांमध्ये होणाऱ्या डीलनुसार ठरते. याच्या एका लायसन्सची किंमत जवळपास 70 लाख रुपये इतकी असू शकते. एका लायसनवरून अनेक स्मार्टफोन ट्रॅक करता येऊ शकतात. 2016 मध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, पेगॅससचा वापर करणाऱे फक्त दहा लोकांवर पाळथ ठेवण्यासाठी एनएसओ ग्रुपने तब्बल 9 कोटी रुपये घेतले होते. 2016 च्या प्राइस लिस्टनुसार एनएरसओने दहा डिव्हाइस हॅक करण्यासाठी ग्राहकांकडून 6 लाख 50 हजार डॉलर फी घेतली होती. याशिवाय इन्स्टॉलेशनसाठी 5 लाख डॉलर वेगळे आकारले होते.

पाळत कशी ठेवली जाते?

‘पिगॅसस’ स्पायवेअर स्मार्टफोनमध्ये घुसल्यावर ते त्या फोनमधील खासगी माहिती आणि लोकेशन हॅक करते. तसेच, स्मार्टफोनच्या मायक्रोफोन आणि कॅमेरावरही नियंत्रण मिळविते. या स्पायवेअरच्या विशिष्ट प्रोग्रॅममुळे तो स्मार्टफोनमध्ये असल्याचे समजत नाही आणि गुप्तपणे त्याद्वारे माहिती चोरली जाते किंवा पाळत ठेवली जाते. या व्यक्ती फोनवर जे काही संभाषण करतील, माहिती साठवतील, ती सर्व चोरली जाते. ज्याच्यावर पाळत ठेवायची आहे, त्याच्या स्मार्टफोनमध्ये ‘पिगॅसस’ सोडण्याची ‘एनएसओ’ची पद्धत इतकी आधुनिक आहे की, त्यांना त्या युजरबरोबर कोणत्याही मार्गाने संपर्क करण्याची गरज पडत नाही (झिरो क्लिक ऑप्शन).

‘एनएसओ’विरोधात खटले

व्हॉट्‌सॲप, फेसबुक या कंपन्यांनी दोन वर्षांपूर्वी ‘एनएसओ’विरोधात खटला दाखल केला होता. मिस्ड कॉलचा वापर करून १४०० युजरच्या मोबाईल फोनमध्ये घुसखोरी झाल्याचा दावा ‘व्हॉट्‌सॲप’ने केला होता. इस्राईल आणि सायप्रसमध्येही या कंपनीविरोधात तक्रार दाखल झाली होती. त्यांच्याविरोधात इतरही अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT