Cancer patients treatment
Cancer patients treatment  sakal media
विज्ञान-तंत्र

लहानपणी कॅन्सरशी झुंज दिलेल्यांना सातत्यानं आजारी पडण्याचा धोका - Study

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : लहान असताना कॅन्सरशी झुंज देऊन त्यातून मुक्त झाल्यानंतरही त्याचे विपरित परिणाम आपल्या शरिरावर दिसून येऊ शकतात. ज्यामुळं मोठेपणी संबंधीत व्यक्ती सातत्यानं आजारी पडण्याचा धोका असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये यावर अभ्यास करण्यात आला आहे.

वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबंधी साधारण लोकांपेक्षा जास्त वेळा दवाखान्यात जावं लागलेल्या लोकांसाठी या अभ्यास प्रक्रियेत दोन गट करण्यात आले होते. पहिल्या गटातील लोकांमध्ये सर्जरीद्वारे या रोगाची वाढ बंद करण्यात आली होती आणि दुसऱ्या गटातील लोकांमध्ये ज्यांच्यावर केमोथेरपी आणि रेडिओथेरपी करण्यात आली होती. केमोथेरपी आणि रेडिओथेरपी झालेल्या लोकांना पहिल्या गटातील लोकांपेक्षा जास्त वेळा दवाखान्यात जावे लागले. वयाच्या 45 व्या वर्षी सर्वसाधारण लोकांपेक्षा पहिल्या गटातील लोकांना दुप्पट वेळा तर दुसऱ्या गटातील लोकांना सात वेळा आजारांमुळे दवाखान्यात जावे लागल्याचं अभ्यासातून दिसून आलं आहे. यावरुनच केमोथेरपी आणि रेडिओथेरपी झालेल्यांना कर्करोग पुन्हा होण्याचा धोका असतो, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. डॉ. अलवीन लाई यांच्या माहितीनुसार ८० टक्के मुलं आणि तरूण या कर्करोगापासून बरे होतात. मात्र, त्यानंतर त्यांना गंभीर आणि विचित्र प्रकारचे रोग उद्भण्याची शक्यता असते. त्यामुळं अशा व्यक्तींच्या कुटुंबियांनी आणि आरोग्यसेवकांनी याचे दिर्घकालीन परिणाम गृहित धरले पाहिजेत, असंही या अभ्यासात म्हटलं आहे.

'द लॅन्सेट'मध्ये रिसर्च पेपर प्रकाशित

'द लॅन्सेट' रीजनल हेल्थद्वारे प्रकाशित इंग्लंडमधील एका रिसर्चनुसार २५ वर्षांपूर्वी कर्करोग झालेल्या 3,466 रुग्ण आणि ज्यांना कर्करोग होऊन पाच वर्ष झाली त्यांची तुलना 13,517 रुग्णांशी केली आहे. ज्यांना आयुष्यात उशीरा या आजाराची लागण झाली अशा लोकांचं वय, लिंग, सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि वंचिततेची पातळी यांच्या आधारे दोन गट करण्यात आले होते. यामध्ये वयाच्या 18 व्या वर्षी कर्करोगापासून वाचलेले, दोन गटातील 183 रूग्णांची शारीरिक व मानसिक स्थिती, त्यांना किती वेळा दवाखान्यात जावे लागले, कर्करोगाचा प्रकार कोणता होता व त्यावर कोणते उपचार करण्यात आले याचा अभास करण्यात आला.

दहा वर्षांनी आयुष्य होतं कमी

या अभ्यासात असंही दिसून आलंय की, बरे झालेल्या रूग्णांमध्ये हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजार निर्माण झाल्याचं दिसून आलं. त्यांचं आयुष्य 10 वर्षांनी कमी झाल्याचंही दिसून आलं. ज्यांच्यात रोगप्रतिकारकशक्ती संदर्भात आजार निर्माण झाले, त्यांनी सरासरी ६.७ वर्षे गमावली त्यानंतर कर्करोगानं त्यांची ११ वर्षांनी आयुष्य कमी झाल्याचंही दिसून आलं. सर्व सुविधांनी वंचित भागात राहणाऱ्या लोकांना या आजारांचा धोका जास्त असतो कारण जगण्याच्या प्रचंड ओझ्याचा त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, असंही या अभ्यासात म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT