India Mobile Congress eSakal
विज्ञान-तंत्र

IMC 2023 : काय आहे 'इंडिया मोबाईल काँग्रेस'? आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

IMC 2023 या परिषदेत 22 देशांचे एक लाखांहून अधिक प्रतिनिधी भाग घेणार आहेत.

Sudesh

आज (27 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सातव्या 'इंडिया मोबाईल काँग्रेस'चे उद्घाटन होणार आहे. आशियातील हा सर्वात मोठा टेलिकॉम, मीडिया आणि टेक्नॉलॉजी व्यासपीठ आहे. हा कार्यक्रम 27 ते 29 ऑक्टोबर यादरम्यान पार पडेल. आज सकाळी 9:45 वाजता दिल्लीतील 'भारत मंडपम'मध्ये याचं उद्घाटन होणार आहे.

या परिषदेमध्ये टेलिकम्युनिकेशन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची प्रगती जगासमोर मांडण्यात येईल. तसंच, या परिषदेमध्ये कित्येक मोठ्या घोषणा होतील. याठिकाणी विविध प्रकारचे स्टार्टअप्स आपले नवनवीन प्रॉडक्ट्स सादर करणार आहेत.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये 5G तंत्रज्ञान वापरणाऱ्या 100 प्रयोगशाळांना पुरस्कार देणार आहेत. '100 5G लॅब' या अभियानाअंतर्गत या प्रयोगशाळा तयार करण्यात येत आहेत.

IMC 2023 या परिषदेत 22 देशांचे एक लाखांहून अधिक प्रतिनिधी भाग घेणार आहेत. यामध्ये तब्बल 5,000 हून अधिक CEO स्तराचे प्रतिनिधी असतील. 230 प्रेझेंटर्स आणि 400 हून अधिक स्टार्टअप्स आणि इतर स्टेकहोल्डर्स देखील याठिकाणी असतील.

यावर्षीची थीम

यावर्षीच्या इंडिया मोबाईल काँग्रेसची थीम 'ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन' अशी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकासक, निर्माता आणि निर्यातक म्हणून भारताचे स्थान मजबूत करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या तीन दिवसीय परिषदेमध्ये 5G, 6G, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला जाईल. तसंच सेमीकंडक्टर उद्योग, हरित तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा इत्यादींशी संबंधित समस्यांवर चर्चा होणार आहे. यासोबतच नवीन स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी आणि प्रस्थापित उद्योजकांमध्ये परस्पर संबंध वाढवण्यासाठी 'अस्पायर' हे अभियान देखील राबवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT