Poco C50
Poco C50 Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offer: पहिल्याच सेलमध्ये स्वस्तात मिळतोय POCO चा शानदार फोन, अवघ्या ५९९ रुपयात करा खरेदी

सकाळ डिजिटल टीम

Poco C50 First Sale: स्मार्टफोन ब्रँडने पोकोने काही दिवसांपूर्वीच आपला लेटेस्ट फोन Poco C50 ला भारतात लाँच केले होते. या फोनची आजपासून विक्री सुरू झाली आहे. पहिल्या सेलमध्ये या फोनला बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. या फोनवर आकर्षक ऑफरचा फायदा मिळेल. Poco C50 च्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

POCO C50 चे एक्सचेंज आणि डिस्काउंट ऑफर

POCO C50 च्या स्मार्टफोनची मूळ किंमत ९,९९९ रुपये आहे. मात्र, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर Poco C50 स्मार्टफोन २७०० रुपयांच्या डिस्काउंटनंतर ७,२९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डने पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅकचा फायदा मिळेल. तसेच, तुम्ही फोनला २५४ रुपये ईएमआयवर देखील खरेदी करू शकता.

पोकोच्या या फोनवर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. यावर ६,७५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास पोको सी५० स्मार्टफोन फक्त ५९९ रुपयात तुमचा होईल. या फोनवर १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

हेही वाचा: Maruti Car: दरमहिना फक्त २० हजार द्या अन् घरी घेऊन जा १० लाखांची गाडी, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

POCO C50 चे स्पेसिफिकेशन्स

POCO C50 स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज दिले आहे. यात ६.५२ इंच एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. तर फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सल ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर दिला आहे. फोन मीडियाटेक हीलियो ए२२ प्रोसेसर सपोर्टसह येतो. तर पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएच लिथियन आयन बॅटरी देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: राज्य सहकारी बँकेकडून विठ्ठल कारखान्याचा साखर साठा ताब्यात घेण्याची नोटीस प्रसिद्ध

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT