poco x4 pro 5g will be launched tomorrow n india check price and all details  
विज्ञान-तंत्र

उद्या लॉन्च होतोय Poco X4 Pro 5G फोन; मिळेल 11GB पर्यंत रॅम

सकाळ डिजिटल टीम

स्मार्टफोन कंपनी Poco उद्या (28 मार्च) एक नवीन स्मार्टफोन Poco X4 Pro 5G लाँच करणार आहे. जागतिक बाजारात लॉन्च केल्यानंतर कंपनी Poco X4 Pro भारतात घेऊन येत आहे. हा फोन दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टच्या माध्यमातून लॉन्च केला जाईल. फोनच्या भारतीय व्हेरिएंटमध्ये 64MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार आहे तर जागतिक मॉडेल 108MP लेन्ससह लॉन्च करण्यात आले होते. Poco ने गेल्या महिन्यात M-सिरीज अंतर्गत दोन स्मार्टफोन लॉन्च केले, M4 Pro 5G आणि M4 Pro.

काय खास असेल?

- नवीन Poco X4 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 64MP मुख्य सेन्सर उपलब्ध असेल, जो 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सरसह असेल. X4 Pro 5G मध्ये 16MP सेल्फी लेन्स वापरली जाईल. Poco X4 Pro 5G मायक्रोसाइट आधीच फ्लिपकार्टवर लाईव्ह आहे.

त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार Poco X4 Pro 5G मध्ये 1200 nits पीक ब्राइटनेससह 6.67-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असेल. हे 120Hz पॅनेल असणार आहे. पॉवरसाठी, फोन बॉक्समध्ये 67W फास्ट चार्जरसह 5000mAh बॅटरी मिळेल.

- या फोनमध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट वापरला आहे आणि 6GB RAM सह जोडला जाण्याची शक्यता आहे. फोनमध्ये एक्सपांडेबल स्टोरेजचा पर्यायही असेल. Poco X4 Pro 5G Android 11 वर आधारित MIUI 13 स्किनसह येऊ शकतो. फोनमध्ये 11GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम देखील उपलब्ध आहे.

भारतात किंमत इतकी असू शकते!

Poco X4 Pro 5G मिड-सेगमेंटमध्ये असेल आणि 6GB/12GB मॉडेलसाठी कदाचित त्याची किंमत सुमारे 16,999 रुपये असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT