POCO X6 Series
POCO X6 Series eSakal
विज्ञान-तंत्र

POCO X6 Series : 'पोको'ने लाँच केली बहुप्रतिक्षित स्मार्टफोन सीरीज; स्वस्तात मिळतील फ्लॅगशिप फीचर्स

Sudesh

POCO X6 Series : पोको मोबाईल कंपनीने 2024 मधील आपली पहिली स्मार्टफोन सीरिज लाँच केली आहे. POCO X6 आणि POCO X6 Pro अशी या दोन स्मार्टफोनची नावं आहेत. यातील बेस मॉडेलचे तीन, तर प्रो मॉडेलचे दोन व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत.

पोको X6 च्या बेस मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 चिपसेट दिला आहे. तर प्रो मॉडेलमध्ये मीडियाटेक डायमेंशन 8300-Ultra SoC चिपसेट दिला आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 1.5K रिझॉल्यूशन असणारा 6.67 इंच मोठा pOLED डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz एवढा आहे.

POCO X6 5G या या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा हा 64MP क्षमतेचा आहे. सोबत यात 13MP अल्ट्रावाईड आणि 2MP एक्स्ट्रा कॅमेरा दिला आहे. X6 Pro स्मार्टफोनमध्ये OIS असणारा 64MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रावाईड लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर मिळतो.

किंमत

पोको X6 5G स्मार्टफोनचे तीन व्हेरियंट उपलब्ध आहेत. यातील 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 19,999 रुपये आहे. 12GB+256GB व्हेरिंयंटची किंमत 21,999 रुपये आहे. तर 12GB+512GB व्हेरियंटची किंमत 22,999 रुपये आहे.

POCO X6 Pro 5G या स्मार्टफोनचे दोन व्हेरियंट उपलब्ध आहेत. यातील 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 24,999 रुपये आहे. तर 12GB+512GB व्हेरियंटची किंमत 26,999 रुपये आहे.

या दोन्ही स्मार्टफोनची बुकिंग सुरू झाली असून, 16 जानेवारीपासून विक्री सुरू होणार आहे. फ्लिपकार्टवर यासाठी ICICI कार्ड वापरल्यास 2,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. या फोनवर 2,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंटही उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT