Sim-Connection 
विज्ञान-तंत्र

मोबाईल SIM कनेक्शनच्या नियमात होणार बदल

पीटीआय

नवी दिल्ली - मोबाईल सिमकार्डच्या व्हेरिफिकेशनबाबत दूरसंचार विभाग लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामुळे प्रीपेड कनेक्शन असलेल्या ग्राहकांना पोस्टपेड करणं सोपं होणार आहे. सध्या प्रीपेड सिम कार्ड पोस्टपेड करायचं असेल तर ग्राहकांना व्हेरिफिकेशन करावं लागतं. आता ते करावं लागणार नाही. फक्त एक ओटीपी दिल्यानंतर ग्राहकांचे प्रीपेड कार्ड पोस्टपेड होणार आहे. त्यामुळे व्हेरिफिकेशनसाठी लागणारी इतर प्रक्रिया आणि वेळ वाचणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दूरसंचार विभागाकडून लवकरच यासाठी नवी नियमावली जारी केली जाण्याची शक्यता आहे. याआधी ग्राहकांना त्यांचे सिमकार्ड पोस्टपेड करण्यासाठी अर्ज करावा लागत होता. आता तो करावा लागणार नाही अशी माहिती समोर येत आहे. म्हणजेच आता ग्राहकांना पडताळणीची प्रक्रिया पुन्हा करण्याची गरज भासणार नाही. फक्त एका ओटीपी द्वारे ही पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसंच पोस्टपेड कार्डचे बिलासाठी पत्तासुद्धा ग्राहकांना अपडेट करता येणार आहे. कंपनीच्या वेबाइसवरून ग्राहक त्यांच्या पत्त्याचा पुरावा देऊ शकतील. याबाबतचे वृत्त सीएनबीसीने दिले आहे.

प्रीपेड कनेक्शन पोस्टपेड करण्यासाठीच्या प्रक्रियेचे नवे नियम दूरसंचार विभागाकडून पुढच्या एकदोन आठवड्यात जारी केले जण्याची शक्यता आहे. सध्या भारतात 90 कोटींहून अधिक प्रीपेड मोबाईल ग्राहक आहेत. जम्मू काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांनासुद्धा आणि तिथल्या स्थानिकांना यामुळे फायदा होऊ शकतो. जम्मू काश्मीरमध्ये बाहेरच्या राज्यातील प्रीपेड कार्ड चालत नसल्यानं तिथं पोस्टपेडचा वापर करावा लागतो.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Price Cut: हॉर्लिक्स, विक्स, झंडू बामसह रोजच्या वापरतल्या वस्तू स्वस्त! कंपन्यांनी जाहीर केली नवी किंमत, वाचा एका क्लिकवर...

Uttrakhand : सलग दुसऱ्या दिवशी CM धामी ऍक्शन मोडवर; मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली आपत्तीग्रस्त भागाची पाहणी  

Bandu Andekar : बंडू आंदेकरचे कारनामे सुरुच, जेलमधूनच चालवत होता जुगार अड्डा, पोलिसांची धडक कारवाई

माेठी बातमी! लाखो जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार; आरोग्य विभागाचे आदेश; दाखले पोलिसांकडून होणार जप्त, नेमकं काय कारण

Uruli Kanchan Crime : 'बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण'; उरुळी कांचन पोलिस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT