pure ev entrance 
विज्ञान-तंत्र

एकदा चार्ज केल्यावर सर्वाधिक धावणारी इलेक्ट्रिक स्कूटर; बजाज चेतकला देणार टक्कर

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यामुळेच सध्याच्या वाहन निर्मिती कंपन्यांशिवाय नव्या कंपन्यासुद्धा या क्षेत्रात उतरत आहेत. यातच आता हैदराबादमधील स्टार्टअप कंपनी प्युअर ईव्हीने नवी हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची तयारी केली आहे. नव्या स्कूटरचे नाव एंट्रेस निओ असं ठेवण्यात आलं आहे. ही स्कूटर अधिकृतपणे 1 डिसेंबरला लाँच केली जाणार आहे. 

विशेष म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बजाज चेतक आणि टीव्हीएस आयक्यूब या आधीपासूनच स्पर्धेत आहेत. बजाज चेतक एकदा चार्जिंग केल्यास इको मोडवर जवळपास 95 किमी इतकी धावू शकते. तर स्मार्ट मोडवर 85 किमी धावेल असा दावा कंपनीने केला आहे. तर टीव्हीएस आयक्यूब फुल चार्जिंग असल्याच 75 किमी पर्यंत धावू शकते. त्यामुळे या गाड्यांच्या तुलनेत प्युअर ईव्हीची एंट्रेस निओ जास्त धावत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. आता बाजारात गाडी लाँच झाल्यानंतर प्रत्यक्षात कसा प्रतिसाद मिळतो हे पहावं लागणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये 1.5 किलोवॅट क्षमतेची बॅटरी किंवा 2.2 किलोवॅट पीक BLDC मोटर असणार आहे. तसंच 5 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग पकडू शकते असा दावाही कंपनीने केला आहे. इको मोडमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर 120 किमी पर्यंत धावू शकते. कंपनीने सध्या बाजारात असेलल्या इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा एट्रेंस निओ अधिक दमदार असल्याचा दावा केला आहे. तसंच या गाडीची किंमत 75 हजार 999 रुपये असल्याचंही आधीच जाहीर करण्यात आलं आहे.

नव्या स्कूटरबाबत सांगताना कंपनीचे सहसंस्थापक विकास म्हणाले की, नव्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वेगाने पिकअप घेणं आणि जास्त अंतर धावण्याची क्षमता आहे. कंपनीने नुकतंच नेपाळसोबत काही प्रोडक्ट लाँच केली आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO घनसावंगी तहसील कार्यालयाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT