Railway Bike Parcel Charges eSakal
विज्ञान-तंत्र

Bike Parcel : दुसऱ्या शहरात शिफ्ट होताय? रेल्वेने अशी नेता येईल तुमची दुचाकी; जाणून घ्या प्रक्रिया

Railway Bike Parcel Charges : दुचाकी दुसऱ्या शहरात नेण्यासाठी तुम्ही भारतीय रेल्वेची मदत घेऊ शकता.

Sudesh

शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी आजकाल बऱ्याच जणांना दुसऱ्या शहरात जावं लागतं. अशा वेळी बाकी सगळं सामान तर आरामात नेता येतं. मात्र आपली दुचाकी जर दुसऱ्या शहरात न्यायची असेल, तर त्यासाठी बराच खर्च करावा लागतो.

जर तुम्ही शिफ्ट होत असलेलं शहर घरापासून जवळ असेल, तर दुचाकीवर बसून जाण्याचा पर्याय तुमच्याकडे असतो. मात्र, काहीशे किलोमीटर दूर असलेल्या शहरात दुचाकी नेण्यासाठी दुसऱ्या वाहनाची मदत घ्यावी लागते. खासगी वाहने अशा वेळी भरपूर भाडं आकारतात. शिवाय ते सुरक्षितपणे तुमची गाडी नेतील याची गॅरंटीही देता येत नाही.

यामुळेच, दुचाकी दुसऱ्या शहरात नेण्यासाठी तुम्ही भारतीय रेल्वेची मदत घेऊ शकता. रेल्वेच्या माध्यमातून तुम्ही कमी खर्चामध्ये आणि सुरक्षितपणे तुमची दुचाकी दुसऱ्या शहरात नेऊ शकता. तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल, तर लगेज म्हणून दुचाकी सोबत नेऊ शकता. तसंच, पार्सल म्हणूनही तुम्ही आपली दुचाकी दुसऱ्या शहरात पाठवू शकता.

असं पाठवा पार्सल

  • जर तुम्हाला गाडी पार्सल पाठवायची असेल, तर त्यासाठी रेल्वेच्या पार्सल ऑफिसला जाऊन बुकिंग करावी लागेल.

  • यासाठी तुम्हाला गाडीच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटच्या दोन फोटोकॉपी (झेरॉक्स) जमा कराव्या लागतील.

  • यानंतर तुम्हाला एक फॉर्म मिळेल, ज्यावर गाडीच्या डीटेल्स भराव्या लागतील. यात कंपनी, मॉडेल, रजिस्ट्रेशन नंबर, वजन, किंमत अशा गोष्टी द्यावा लागतील.

  • फॉर्मवर बोर्डिंग स्टेशन आणि डेस्टिनेशन देखील भरावं लागेल.

  • यानंतर तुम्हाला गाडीचं पेट्रोल टँक पूर्णपणे रिकामं करावं लागेल. तसंच, चांगल्या प्रकारे पॅकिंग केल्यानंतर, कार्डबोर्डवर स्पष्ट अक्षरांमध्ये पाठवणाऱ्या आणि पोहोचणाऱ्या स्टेशनचा पत्ता लिहावा लागेल.

लगेज म्हणून कशी न्याल?

  • तुम्हाला प्रवासात सोबत दुचाकी न्यायची असेल, तर त्यासाठी रेल्वेच्या वेळेच्या किमान अर्धा तास अगोदर तुम्हाला स्टेशनवर जावं लागेल.

  • यानंतर आपलं तिकीट दाखवून तुम्हाला गाडीला लगेज म्हणून घेऊन जाण्यासाठी वेगळे चार्जेस भरावे लागतील. याचं बिल तुम्हाला मिळेल.

  • रेल्वे आल्यानंतर लगेजच्या डब्यात गाडी भरून घेता येईल. अर्थात, यासाठी त्या डब्यात रिकामी जागा हवी.

  • तुमच्या स्टेशनला पोहोचल्यानंतर तुम्ही आपलं तिकीट आणि लगेजचं बिल दाखवून गाडी घेऊन जाऊ शकाल.

किती येतो खर्च?

गाडी पार्सल म्हणून नेण्यासाठीचा खर्च हा तुमच्या प्रवासाच्या अंतरावर ठरतो. तसंच, तुम्ही कोणत्या रेल्वेने प्रवास करत आहात यावरुनही तिकिटाची किंमत निश्चित होते. गाडीच्या वजनानुसार देखील ही किंमत बदलू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT