RBI Payment System Esakal
विज्ञान-तंत्र

Online Payment : यूपीआय पेमेंट होणार आणखी सोपं, इंटरनेटशिवाय पाठवता येतील पैसे; RBI आणतंय नवीन सिस्टीम

मोबाईलला नेटवर्क नसले तरीही या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार करता येणार आहेत.

Sudesh

यूपीआयच्या मदतीने ऑनलाईन व्यवहार अगदी सोपे झाले आहेत. असं पेमेंट करताना आपल्याला वायफाय किंवा इंटरनेट कनेक्शनची गरज भासते. मात्र आरबीआय सध्या अशा सिस्टीमवर काम करत आहे, ज्यामुळे इंटरनेटशिवाय देखील यूपीआय पेमेंट करता येईल.

आरबीआयची (RBI) ही लाइटवेट पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम आहे. एखादी नैसर्गिक आपत्ती आलेल्या किंवा हिंसाग्रस्त भागात बऱ्याच वेळा इंटरनेट उपलब्ध नसते. अशा ठिकाणी पैशांचे व्यवहार करता यावेत यासाठी ही सिस्टीम तयार करण्यात येत आहे. केवळ ठराविक लोकांनाच ही सुविधा मिळणार आहे.

मोबाईल नेटवर्कची गरज नाही

आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात या सिस्टीमबद्दल (RBI new payment system) माहिती दिली आहे. विशेष म्हणजे यूजरच्या मोबाईलला नेटवर्क नसले तरीही या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार करता येणार आहेत. हे पेमेंट सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी अगदी कमी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची गरज भासेल, असं आरबीआयने म्हटलं आहे.

आपत्कालीन काळात वापर

युद्धाच्या परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे एक बंकर काम करतं, त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत ही पेमेंट सिस्टीम (New Emergency payment system) काम करेल. कोणत्याही परिस्थितीत व्यवहार थांबणार नाहीत याची ही काळजी घेईल. यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीतही देशाची अर्थव्यवस्था रुळावर राहील.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर कार्यरत नसते. अशा वेळी पेमेंट सिस्टीम देखील कोलमडून पडतात. त्यामुळे अशा परिस्थितीसाठी आपल्याला तयार राहणं गरजेचं आहे, असं आरबीआयने म्हटलं आहे.

दरम्यान, ही सिस्टीम केवळ आपत्कालीन वापरासाठी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्यांसाठी ही कायम उपलब्ध नसेल. केवळ आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये पेमेंटचे इतर मार्ग बंद झाल्यानंतरच ही सिस्टीम वापरता येईल. ही सिस्टीम कधी लाँच होणार आहे याबाबत मात्र अहवालात माहिती देण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 5th T20I: लखनौचा सामना 'धुक्यात' हरवला; आता भारत-दक्षिण आफ्रिका पाचवा सामना कधी व कुठे होणार, ते पाहा...

Nagpur News: डागा रुग्णालयात नवजात शिशूचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ, वैद्यकीय अधीक्षकांचे चौकशीचे आदेश

Viral Video: 'अरे पैसा नही चाहिये', रेल्वे स्टेनशवरील बाप-लेकीची गोड व्हिडिओ व्हायरल

पिंजऱ्यात शिकार, जंगलात राज! वाघीण 'तारा'ची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दणक्यात एन्ट्री, शास्त्रीय पद्धतीने कशी राबवली 'सॉफ्ट रिलीज'?

Atal Bihari Vajpayee : राष्ट्रपतिपद स्वीकारण्यास वाजपेयींचा होता नकार; तत्कालीन माध्यम सल्लागार अशोक टंडन यांच्या पुस्तकात दावा

SCROLL FOR NEXT