Social Media Sakal
विज्ञान-तंत्र

Social Media down: वारंवार का ठप्प होतेय Facebook, Twitter ची सेवा? जाणून घ्या यामागचे प्रमुख कारण

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामची सेवा वापरताना यूजर्सला वारंवार समस्या येत आहे. हे प्लॅटफॉर्म्स डाउन होण्यामागे नक्की काय कारण असू शकते,जाणून घ्या.

Akash Ubhe

Social Media Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम वापरणाऱ्या यूजर्सची संख्या मोठी आहे. आज स्मार्टफोन वापरणारा प्रत्येक यूजर सोशल मीडियावर आहे. मात्र, दर काही दिवसांनी या प्लॅटफॉर्म्सची सेवा ठप्प होताना दिसते. काल गुगलची ईमेल सेवा जीमेल वापरताना यूजर्सला अडचणी येत होत्या. आज मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर देखील ठप्प झाले आहे. काही महिन्यांपूर्वी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपची सेवा देखील जवळपास ६ तासांसाठी ठप्प झाली होती.

एका प्लॅटफॉर्मची सेवा ठप्प झाल्यानंतर यूजर्स इतर प्लॅटफॉर्म्स तक्रार करत असतात. अनेकजण मजेशीर मीम्स देखील शेअर करतात. परंतु, जगभरात कोट्यावधी यूजर्स असलेल्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची सेवा वारंवार ठप्प का होते? असा प्रश्न निर्माण होतो. यामागे काय कारणं असू शकतात त्याविषयी जाणून घेऊया.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल

अनेकदा BGP अर्थात बॉर्डर गेटवे प्रोटोकॉलमध्ये आलेल्या त्रुटीमुळे हे प्लॅटफॉर्म डाउन होत असल्याचे समोर आले आहे. BGP मुळेच इंटरनेट योग्यप्रकारे काम करते. इंटरनेट हे असंख्य नेटवर्क्सचे एक जाळे आहे. BGP चे काम हे या नेटवर्क्सला एकसाथ जोडून ठेवणे हेच असते. त्यामुळे BGP मध्ये त्रुटी आल्यास हे काम करणे बंद करते. राउटर्सवरील इंटरनेट देखील अशावेळी काम करत नाही. मोठे राउटर्स आपल्या रुट्सला वारंवार अपडेट करत असतात, जेणेकरून शेवटच्या सोर्सपर्यंत नेटवर्कशी कनेक्ट करता येईल.

DNS मुळे येते समस्या

काही महिन्यांपूर्वी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपची सेवा जवळपास ६ तासांसाठी ठप्प झाली होती. या आउटेज मागे DNS असल्याचे सांगितले जाते. DNS म्हणजेच डोमेन नेम सिस्टम हे इंटरनेटचा महत्त्वाचा भाग आहे. हे एकप्रकारे इंटरनेटसाठी फोनबुक असते. हे एकप्रकारचे टूल आहे, जे डोमेन नेमला जसे की फेसबुकला अचूक इंटरनेट प्रोटोकॉलमध्ये कन्वर्ट करते. डीएनएसमध्ये त्रुटी आल्यास यूजर ब्राउजर आणि अ‍ॅपद्वारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची सेवा वापरू शकत नाही.

हॅकिंग

या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर कोट्यावधी यूजर्स करत असतात. त्यामुळे हॅकर्स यूजर्सची माहिती चोरी करण्यासाठी सायबर अटॅक करतात. सायबर अटॅकमुळे देखील अनेकदा हे प्लॅटफॉर्मस काहीकाळासाठी सेवा बंद करतात. मात्र, अनेकदा कंपन्या कोणताही सायबर अटॅक झाला नसल्याचा देखील दावा करतात.

सेवा ठप्प झाल्यास होते मोठे नुकसान

अवघ्या काही मिनिटांसाठी असो अथवा तासांसाठी, सेवा ठप्प झाल्यामुळे या सोशल मीडिया कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. ऑक्टोबर २०२१ मध्ये सेवा ठप्प झाल्यामुळे फेसबुकला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. ६ तासांसाठी सेवा ठप्प झाल्यामुळे फेसबुकच्या शेअरमध्ये तब्बल ४.९ टक्क्यांनी घसरण झाली होती. यामुळे फेसबुकचे तब्बल ७ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT