Redmi Note 12 Pro Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offer: कन्फर्म! 200MP कॅमेऱ्यासह येतोय रेडमीचा फोन, 'या' तारखेला भारतात करणार एंट्री

स्मार्टफोन ब्रँड शाओमी आपला नवीन ५जी फोन Redmi Note 12 Pro ला ५ जानेवारीला भारतात लाँच करणार आहे. या फोनमध्ये २०० मेगापिक्सल कॅमेरा मिळेल.

सकाळ डिजिटल टीम

Offer on Redmi Note 12 Pro Smartphone: स्मार्टफोन ब्रँड शाओमी आपला नवीन ५जी फोन Redmi Note 12 Pro ला भारतात लाँच करणार आहे. हा फोन ५ जानेवारीला भारतात एंट्री करेल. या फोनमध्ये २०० मेगापिक्सल कॅमेरा आणि १२० वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला जाईल. फोनला काही दिवसांपूर्वीच Redmi Note 12 Pro Speed Edition नावाने इतर बाजारात लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे फोनचे फीचर्स आधीच समोर आलेले आहेत.

Redmi Note 12 Pro 5G ची किंमत

Redmi Note 12 Pro 5G ला चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आले आहे. फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी बेस व्हेरिएंटची किंमत १,६९९ चीनी युआन (जवळपास २० हजार रुपये) आहे. त्यामुळे भारतात देखील या फोनची किंमत जवळपास २० हजार रुपये असू शकते. फोन शिमर ग्रीन, टाइम ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक रंगात भारतात लाँच होईल.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

Redmi Note 12 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

फ्लिपकार्टवर Redmi Note 12 Pro 5G च्या काही फीचर्सला लिस्ट करण्यात आले आहे. कंपनीने जारी केलेल्या पोस्टरनुसार फोनमध्ये २०० मेगापिक्सल कॅमेरा आणि १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. तसेच, फोन १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्लेसह येईल. यात MediaTek Dimensity 1080 प्रोसेसरचा सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे.

रेडमीचा हा फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल. यात २०० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा दिला जाईल, जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनसह (OIS) येईल. फोनमध्ये ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा मिळेल. तर सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. पॉवर बॅकअपसाठी १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल.

हेही वाचा: Twitter: इलॉन मस्कने कर्मचाऱ्यांवर आणले वाईट दिवस, कामावर घेऊन जावा लागतोय टॉयलेट पेपर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT