Redmi Watch  google
विज्ञान-तंत्र

7 स्पोर्ट्स मोडसह Redmi Watch भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत

Xiaomi ची नवीन स्मार्टवॉच Redmi Watch भारतीय बाजारात दाखल झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Xiaomi ची नवीन स्मार्टवॉच Redmi Watch भारतीय बाजारात दाखल झाली आहे. ही स्मार्टवॉच मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच करण्यात आली होती. या रेडमी (Readme) वॉचमध्ये देण्यात आलेली दमदार बॅटरीने हे या स्मार्ट वॉचचे (Smart Watch) मुख्य फीचर आहे, ही बॅटरी एका चार्जवर 7 दिवसाचा बॅकअप देते. यासह स्मार्टवॉचमध्ये 120 वॉच फेस आणि 7 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. आज आपण या Redmi Watch च्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीबद्दल जाणून घेणार आहोत. (redmi watch launched in india with 7 sports mode know price)

Redmi Watchचे स्पेसिफिकेशन

Redmi Watchमध्ये 1.4 इंचाचा एलसीडी कलर टच-स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची रिजोल्यूशन 320 × 320 पिक्सल आहे. ही स्मार्टवॉच 120 वॉच फेससह येत. या घड्याळात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 आणि 7 स्पोर्ट मोड उपलब्ध असतील, ज्यात धावणे आणि आऊट-डोअर सायकलिंग सारख्या एक्टिव्हीटींचा समावेश आहे. याशिवाय स्मार्टवॉचमध्ये हार्ट-रेट, जिओमॅग्नेटिक आणि एम्बियंट लाइट सारख्या सेन्सर्स देण्यात आले आहेत.

रेडमी वॉचमध्ये 230mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी एका चार्जवर 7 दिवसाचा बॅकअप देते. याशिवाय स्मार्टवॉचमध्ये कॉल-मेसेज नोटिफिकेशनपासून स्लीप ट्रॅकिंगपर्यंतची सुविधा असेल. तचेच या घड्याळाचे वजन 35 ग्रॅम आहे.

रेडमी वॉचची किंमत

कंपनीने रेडमी वॉचची किंमत 3,999 रुपये ठेवली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर या स्मार्टवॉचची विक्री 25 मेपासून सुरू होईल.

शाओमीच्या नवीन Redmi Watch ला नॉइस कलरफिट प्रो 3 कडून चांगली टक्कर मिळणार आहे. नॉईस कलरफिट प्रो 3 बद्दल बोलायचे तर त्याची किंमत 4,499 रुपये आहे. नॉईस कलरफिट प्रो 3 मध्ये 1.55-इंचाचा टच एचडी ट्रूव्यू डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 320 * 360 पिक्सल आहे. या स्मार्टवॉचमध्ये क्लाऊड-आधारित वॉच फेस आहे. यासह वॉचमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 देण्यात आले आहे. नॉईस कलरफिट प्रो 3 नवीनतम लेटेस्ट IOS आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालते.

(redmi watch launched in india with 7 sports mode know price)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : सेवागिरी यात्रेत बैलगाडा शर्यतीचा थरार; शाहिद मुलानींच्या बैलजोडीने जिंकला 'पुसेगाव हिंदकेसरी' किताब, तब्बल 1100 बैलगाड्यांचा सहभाग

Cameron Green: काल आयपीएल लिलावात २५.२० कोटी मिळाले अन् आज पठ्ठ्या भोपळ्यावर बाद झाला... KKR ला फसल्यासारखं झालं...

Viral Video: 'सर, हेल्मेट है, फिट नही आता', वृद्ध दुचाकीस्वाराचं उत्तर ऐकून सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस

Kolhapur Forest Incident : बंदुका, सर्च लाईट, दोरी; शिकारींचा जंगलात रात्रीस खेळ चाले, वन विभागाने थरारकरित्या पाठलाग केला अन्

Latest Marathi News Live Update : वांद्रे–वरळी सी लिंकवर थरारक ड्रायव्हिंग, 250 किमी प्रतितास वेगाने कार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT