reliance jio airtel and vodafone idea best recharge plan with long term validity
reliance jio airtel and vodafone idea best recharge plan with long term validity  Recharge plan
विज्ञान-तंत्र

जास्त व्हॅलिडिटी असलेले बेस्ट प्लॅन्स; मिळते फ्री कॉलिंग, डेटा अन् बरंच

सकाळ डिजिटल टीम

जास्त दिवस चालणारे प्रीपेड प्लॅन आजकाल वापरकर्त्यांना हवे आहेत. या प्रीपेड प्लॅनमध्ये वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रास पडत नाही आणि वापरकर्त्यांसाठी ते अतिशय सोयीचे आहे. हे लक्षात घेऊन, Reliance Jio, Airtel (Airtel) आणि Vodafone-Idea (Vi) वापरकर्त्यांना काही बेस्ट दीर्घकालीन प्लॅन ऑफर करत आहेत. या प्लॅन्समध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो आणि एक वर्षापर्यंत वैधता उपलब्ध आहे. चला डिटेल्स जाणून घेऊया.

Reliance Jio चे प्लॅन

कंपनी दररोज 1.5 GB डेटा आणि दीर्घ वैधतेसह दोन बेस्ट प्लॅन देत आहे. कंपनीचे हे प्लॅन 666 रुपये आणि 2545 रुपयांचे आहेत. दोन्ही प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 1.5 GB डेटा देते. या व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये 100 मोफत एसएमएससह देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. कंपनीचा 666 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. त्याच वेळी, 2545 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्ही 336 दिवस जिओच्या सेवेचा आनंद घेऊ शकता.

Airtel चे लाँग व्हॅलिडिटी प्लॅन्स

Airtel चे 666 आणि 719 रुपयांचे प्लॅन दीर्घकालीन व्हॅलिडिटी ऑफर करण्यासाठी खूप लोकप्रिय आहेत. 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 1.5 जीबी डेटा देते. 77 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. कंपनी या प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी Amazon Prime Video च्या मोबाईल व्हर्जनची मोफत ट्रायल देखील देत आहे.

जर आपण 719 रुपयांची प्लॅन पाहिली तर, 84 दिवसांची वैधता, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 मोफत एसएमएससह दररोज 1.5 जीबी डेटा ऑफर केला जात आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Xstream मोबाइल पॅकसह 30 दिवसांसाठी Amazon Prime Video ची मोफत ट्रायल देखील.

Vi चे प्लॅन्स

कंपनी आपल्या वापरकर्त्यांना Airtel प्रमाणेच 666 आणि 719 रुपयांचे प्लॅन ऑफर करत आहे. कंपनीच्या 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरासाठी दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. याशिवाय प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएससह अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. Binge All Night, Weekend Data Rollover, Vi Movies ची मोफत सदस्यता आणि Data Delights सह TV यासह 77 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये अनेक अतिरिक्त फायदे देखील दिले जात आहेत.

दुसरीकडे, कंपनीच्या 719 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा, दररोज 100 मोफत एसएमएस आणि 84 दिवसांच्या वैधतेसह देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग मिळते. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेले अतिरिक्त फायदे 666 रुपयांच्या प्लॅनसारखेच आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT