Relinace Jio new jiobook laptop details leaked check price features specs here 
विज्ञान-तंत्र

Jio मोठ्या धमाक्याच्या तयारीत, लवकरच लॉन्च होणार स्वस्त लॅपटॉप

सकाळ डिजिटल टीम

रिलायन्स जिओ (Relinace Jio) सिम नंतर फीचर फोन आला. यानंतर कंपनीने हा स्मार्टफोन लॉन्च केला आता जिओ कडून लवकरच दोन मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात. काही रिपोर्टनुसार JioPhone 5G आणि JioBook लॅपटॉपवर काम सुरू असून, कंपनी लवकरत मोठा धमाका करु शकते.

कथित JioBook लॅपटॉपच्या बातम्या गेल्या काही काळापासून आपण सतत वाचत आहोत. मात्र नुकत्याच काही रिपोर्टनुसार, JioBook मध्ये Windows 10 दिला जाईल आणि तो ARM बेस्ड लॅपटॉप असेल अशी माहिती समोर आली आहे.

हार्डवेअर सर्टिफिकेशन डॉक्युमेंटमध्येही रिलायन्स जिओच्या लॅपटॉपचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, या डॉक्युमेंटमध्ये या लॅपटॉपच्या फीचर्सबद्दल फारसे सांगितले गेले नाही. या फाइलिंगमध्ये एका चीनी कंपनीचा उल्लेख आहे जी एक OEM आहे म्हणजेच तीच कंपनी Jio साठी लॅपटॉप तयार करेल Emdoor Digital Technology Co Ltd नावाची एक चीनी कंपनी आहे जी या लॅपटॉपचे उत्पादन करू शकते.

JioBook च्या संभाव्य फीचर्सबद्दल सांगायचे तर, यात HD डिस्प्ले दिला जाईल. या लॅपटॉपमध्ये 2GB रॅमचा व्हेरिएंटही दिला जाईल. बेंचमार्क वेबसाइट गीकबेंचनुसार, या लॅपटॉपमध्ये MediaTek MT8788 चिपसेट दिला जाईल. कंपनीचे अनेक अ‍ॅबस्ट्रॅक्ट अॅप्स JioBook मध्ये आधीच लोड केले जातील. हा एक परवडणारा लॅपटॉप असेल आणि कनेक्टिव्हिटीसाठी एचडीएमआय पोर्टसह वायफाय आणि ब्लूटूथ यांसारखी स्टँडर्ड कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतील.

रिलायन्स जिओने याबाबत अधिकृत काहीही घोषणा केलेले नाही. आगामी काळात JioBook बद्दल अधिक स्पष्टता मिळू शकेल. मात्र JioBook पूर्वी, कंपनी JioPhone 5G लॉन्चवर लक्ष केंद्रित करू शकते.

Reliance Jio ने अलीकडेच JioPhone Next स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनला जिओ सिम सारखा प्रतिसाद मिळालेला नाही. पण हा फोन या सेगमेंटमध्ये चांगला आहे, त्यामुळे तो आणखी विकू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

९० वर्षांची परंपरा आजही कायम! बैलगाडीतून निघालेली गणपती मिरवणूक ठरली खास, भाविकांसाठी अविस्मरणीय अनुभव

Pavagadh Ropeway Accident: गुजरातमधील पावगढ शक्तिपीठ येथे मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने सहा जणांचा मृत्यू

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा मुंबईच्या चिंचपोकळी रेल्वे स्थानकावर पोहोचला

भक्तीपासून ते व्यापारापर्यंत... गणपती विसर्जन अर्थव्यवस्थेचे आर्थिक इंजिन कसे बनते? वाचा ₹४५,००० कोटींच्या अर्थप्रवाहाची जादू!

Latest Maharashtra News Updates : 'बिडी-बिहार' वादात केरळ काँग्रेसने आपली चूक मान्य केली

SCROLL FOR NEXT