Robot Dog Kanpur eSakal
विज्ञान-तंत्र

Robot Dog Kanpur : 'रोबोट डॉग'ला पाहून खऱ्या कुत्र्यांची मजेशीर प्रतिक्रिया; कानपूरमधील व्हिडिओ होतोय व्हायरल

IIT Kanpur : इनोव्हेटिव्ह रोबोट डॉग्स बनवणाऱ्या मक्स रोबोटिक्स या कंपनीने हा डॉग तयार केला आहे. या कंपनीचे संस्थापक सीईओ डॉ मुकेश बांगर यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Sudesh

IIT Kanpur Robot Dog : सध्या सगळीकडे एआयचा बोलबाला पहायला मिळत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट तयार केले जात आहेत. यातच काही दिवसांपासून 'रोबोट डॉग' हा प्रकार लोकप्रिय होत आहे. कानपूरमधील IIT च्या मैदानावर असाच एक रोबोट डॉग पहायला मिळाला. मात्र, त्याला पाहून स्थानिक कुत्र्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.

IIT कानपूरमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये कॉलेजच्या लॉनवर एक रोबोट डॉग पहायला मिळत आहे. त्याच्या आजूबाजूला परिसरातील खरे कुत्रे इकडे-तिकडे पळत आहेत. हा व्हिडिओ कॉलेजच्या वार्षिक टेक फेस्टमधील असल्याचं सांगण्यात येत आहे.

मस्क रोबोटिक्स

इनोव्हेटिव्ह रोबोट डॉग्स बनवणाऱ्या मक्स रोबोटिक्स या कंपनीने हा डॉग तयार केला आहे. या कंपनीचे संस्थापक सीईओ डॉ मुकेश बांगर यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. "रोबोट डॉग Vs रिअल डॉग लढाईत झालेला मजेशीर किस्सा" असं कॅप्शन त्यांनी आपल्या व्हिडिओला दिलं आहे.

या व्हिडिओत दिसतंय की रोबोट डॉगला पाहून खऱ्या श्वानांची धांदल उडाली आहे. या नव्या श्वानाचं तोंड नेमकं कोणत्या बाजूला आहे हे शोधत तिथले श्वान याच्या मागे फिरत आहेत. हा मजेशीर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खऱ्या कुत्र्यांची केली नक्कल

या व्हिडिओमध्ये दिसतंय की रोबोट डॉगच्या हालचाली अगदी खऱ्या कुत्र्याप्रमाणेच आहेत. तो चालतोही श्नानांप्रमाणेच. एवढंच नाही, तर तो इतर कुत्र्यांप्रमाणे आपले पुढचे दोन पाय उचलून मागच्या पायांवर बसूही शकतो. तसंच, कुत्रे ज्याप्रमाणे लोळत आपली पाठ खाजवतात, तशीच क्रिया हा रोबोट डॉगही करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT