Royal Enfield Bullet 350 Sakal
विज्ञान-तंत्र

Royal Enfield: दरमहिना 5 हजार द्या अन् घरी घेऊन जा Royal Enfield Bullet 350, पाहा डिटेल्स

Royal Enfield Bullet 350 बाईकला फक्त २२ हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर घरी घेऊन जाऊ शकता. या बाईकमध्ये पॉवरफुल फीचर्स देण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Royal Enfield Bullet 350 Details: Royal Enfield कडे ३५० सीसीपासून ते ६५० सीसीपर्यंत येणाऱ्या शानदार बाईक्स उपलब्ध आहेत. यापैकीच एक Royal Enfield Bullet 350 असून, ही कंपनीच्या सर्वात स्वस्त बाईकपैकी एक आहे. या बाईकची किंमत जवळपास २ लाख रुपये आहे. मात्र, डाउन पेमेंट करून तुम्ही खूपच कमी किंमतीत या बाईकला घरी घेऊन जाऊ शकता. Royal Enfield Bullet 350 च्या किंमत, इंजिन आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Tecno Phone: सर्वात पॉवरफुल प्रोसेसरसह TECNO च्या फोनची भारतात एंट्री, फीचर्स खूपच जबरदस्त; पाहा किंमत

Royal Enfield Bullet 350 ची किंमत

Royal Enfield Bullet 350 च्या टॉप मॉडेलची सुरुवाती किंमत १६३,३३८ रुपये (एक्स-शोरुम) आहे. बाईकची ऑन रोड किंमत १,८८,३३५ लाख रुपयांपर्यंत जाते. मात्र, या बाईकला तुम्ही फक्त २२ हजार रुपये डाउन पेमेंटवर घरी घेऊन जाऊ शकता.

२२ हजार रुपये डाउन पेमेंट केल्यावर तुम्हाला बँकेकडून १,६६,३३५ रुपये लोन मिळेल. यानंतर तुम्हाला ३ वर्ष दरमहिन्याला ५,३४४ रुपये ईएमआय भरावा लागेल.

हेही वाचा: Smartphone Tips: वारंवार फोन चार्ज करावा लागतोय? बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Royal Enfield Bullet 350 बाईकमध्ये मिळेल पॉवरफुल इंजिन

Royal Enfield Bullet 350 मध्ये ३४६ सीसीचे सिंगल सिलेंडर ४ स्ट्रोक इंजिन देण्यात आले असून, हे एअर कूल्ड, फ्यूल इंजेक्टेड टेक्नोलॉजीसह येते. इंजिन ५ स्पीड गियरबॉक्ससह येते. कंपनीचा दावा आहे की, बाईक प्रती लीट ३७ किमी माइलेज देते.

दरम्यान, Royal Enfield Bullet 350 ही कंपनीच्या सर्वात स्वस्त बाईक पैकी एक आहे. ही कंपनीची भारतातील बेस्टसेलर बाईक आहे. पॉवरफुल इंजिनसोबतच यात इतरही शानदार फीचर्स मिळतात.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT