acer predator helios 300 sakal
विज्ञान-तंत्र

टेक्नोहंट : सुपरफास्ट गेमिंगसाठी ‘एसर प्रिडेटर हेलिओज 300’

भारतातील ऑनलाइन गेमिंग क्षेत्राची वाढती क्रेझ लक्षात घेता अनेक गेमिंग लॅपटॉप बाजारात येत आहेत.

ऋषिराज तायडे

भारतातील ऑनलाइन गेमिंग क्षेत्राची वाढती क्रेझ लक्षात घेता अनेक गेमिंग लॅपटॉप बाजारात येत आहेत.

भारतातील ऑनलाइन गेमिंग क्षेत्राची वाढती क्रेझ लक्षात घेता अनेक गेमिंग लॅपटॉप बाजारात येत आहेत. उच्चप्रतीचे ग्राफिक्स, सुपरफास्ट प्रोसेसर, उत्तम स्पीकर्स आणि वेगवान रिफ्रेश रेटमुळे हे एकत्र मिळाल्यास कुणाचाही गेमिंग आनंद द्विगुणीत होईल. ही गरज लक्षात घेता एसरने प्रिडेटर हेलिओज 300 हा नवा लॅपटॉप नुकताच भारतात सादर केला. त्याबाबत...

प्रोसेसर व ग्राफिक्स

गेमिग लॅपटॉप म्हटले, तर तुमच्या लॅपटॉपचा प्रोसेसर आणि ग्राफिक्स कार्ड जितके वेगवान असेल, तितकाच गेमिंगचा अनुभव खास ठरतो. त्यासाठीच प्रिडेटर हेलिओज 300 या लॅपटॉपमध्ये पॉवरफुल 11th Gen Intel Core i9 Processor आणि GeForce RTX 30 Series हे अत्याधुनिक ग्राफिक्स तेदेखील 32 जीबीचे, म्हणजे पर्वणीच म्हणता येईल. तसेच हा प्रोसेसर 4.90 GHz Turbo, 8 cores, and 16 threads सह सुसज्ज असल्यामुळे लॅपटॉपमध्ये कोणत्याही प्रकारचे हायलेव्हल गेम्स विनाअडथळा सहजपणे खेळता येतात.

ऑपरेटिंग सिस्टीम

एसरचा प्रिडेटर हेलिओज 300 मध्ये मुळात विन्डोज 10 ही ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात येते; मात्र तुम्ही नवे व्हर्जन अपडेट करून विन्डोज 11 या ऑपरेटिंग सिस्टिमचा अनुभव घेता येऊ शकता. विन्डोज 10 च्या तुलनेत विन्डोज 11 मध्ये अनेक खास वैशिष्ट्ये अनुभवायला मिळतात.

डिझाइन व डिस्प्ले

एसर प्रिडेटर हेलिओज 300 या लॅपटॉपमध्ये 15.6 इंच'' आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. या लॅपटॉपचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये देण्यात आलेला तब्बल 360 Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले. एवढेच नव्हे, तर खास गेमिंगसाठी फुल एचडी रिझॉल्युशनसह 360Hz, 300Hz, and 165Hz असे तीन वेगवेगळे रिफ्रेश रेट असलेले स्क्रीन पॅनेल देण्यात आले आहे. गरजेनुसार तीनपैकी कोणताही एक रिफ्रेश रेटचा स्क्रीनपॅनल निवडता येते. सोबतच 1920 X 1080 रिझॉल्युशनमुळे स्क्रीनवरील अनुभव खास ठरतो. तसेच उत्तम कार्यक्षमतेसह अंतर्गत चार रंगाचे बॅकलाईट एलईडी असलेले कीबोर्ड, स्क्रीनच्या मागील बाजूस खास प्रिडेटर लोगो लक्ष वेधून घेणारे आहे.

मेमरी आणि स्टोरेज

प्रिडेटर हेलिओज 300 हा खास गेमिंग लॅपटॉप असल्याने लॅपटॉपची रॅमदेखील अधिक असणे अपेक्षित असते. हीच बाब लक्षात घेता हेलिओज 300 सीरिजमध्ये किमान रॅम 12GB, तर कमाल रॅम ही 32 GB देण्यात आली आहे. एसएसडी स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास या लॅपटॉप सीरिजमध्ये 2 TB पर्यंत एसएसडी स्टोरेज देण्यात आले आहे. बेसिक मॉडेलमध्ये 256 GB हार्डडिस्क मिळते, गरेजनुसार तिचा विस्तार करता येतो.

इतर वैशिष्ट्ये

गेमिंग म्हटले तर लॅपटॉप ओव्हरहीट होण्याची शक्यता ही नाकारताच येत नाही. त्यामुळे एसरच्या प्रिडेटर हेलिओज 300 या लॅपटॉपमध्ये खास कूलिंगसाठी 5th Gen AeroBlade 3D Fan Technology चा वापर करण्यात आला आहे. तसेच Intel Killer E2600 Ethernet Controller, Intel Killer Wi-Fi 6 AX1650i, आणि Control Center 2.0 मुळे लॅपटॉपची कार्यक्षमता आणि कनेक्टिव्हिटी वाढवतात. इतर फीचर्स म्हटल्यास लॅपटॉपमध्ये USB 3.2, USB-C, HDMI 2.1, Audio Jack, DTS X ULTRA स्पीकर्स दिले आहेत.

किंमत

एसर प्रिडेटर हेलिओज 300 सीरिज हे खास गेमिंग लॅपटॉप असल्याने प्रोसेसर, ग्राफिक्स, अधिक रिफ्रेशरेटचा डिस्प्ले आणि उत्तम स्टोरेजमुळे या लॅपटॉपची किंमत ही थोडी अधिक आहे. एसरच्या ऑनलाईन स्टोर्ससह अन्य ई-कॉमर्स संकेतस्थळांवर हा लॅपटॉप 1 लाख 44 हजार 999 रुपयांपासून पुढे उपलब्ध झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT