Samsung Finger Print Scanner Update esakal
विज्ञान-तंत्र

Samsung कंपनीने टेक्नॉलॉजीत गाठली नवी उंची! लवकरच आणणार Finger Print स्कॅनरबाबत नवं अपडेट

तंत्रज्ञानानं आणखी उंची गाठली आहे. सॅमसंगनं हे तंत्रज्ञान आणखी विकसित केल्याचा दावा केला आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Samsung Finger Print Scanner: सॅमसंग आणत असलेल्या नव्या टेक्नॉलॉजीची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. गेल्या काही वर्षापासून आपण असे अँड्रॉईड फोन्स वापरत आहोत ज्यामध्ये ठसे स्कॅन केल्यानंतर स्मार्टफोन (Smartphone) अनलॉक होतो. स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी स्मार्टफोनच्या डिस्प्लेजवळ एका खास जागी फिंगरटिप असते. मात्र आता यापुढे जात तंत्रज्ञानानं आणखी उंची गाठली आहे. सॅमसंगनं हे तंत्रज्ञान आणखी विकसित केल्याचा दावा केला आहे.

इंटरनॅशनल मीटिंग ऑफ डिस्प्ले इन्फॉर्मेशननुसार सॅमसंगने (Samsung) आपल्या ऑल-इन-वन ओलेड 2.0 डिस्प्ले आणण्याची घोषणा केली आहे. या प्लान अंतर्गत सॅमसंग नव्या पिढीच्या स्मार्टफोनमध्ये OLED 2.0 ऑल-इन-वन फिंगरप्रिंट सेंसिंगवर काम करत आहे.

काय आहे सॅमसंगची नवी टेक्नॉलॉजी?

गॅलेक्सी स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या OLED डिस्प्लेवर एकानंतर एक काही फिंगरप्रिंट स्कॅन करण्याची क्षमता असणार आहे. या तंत्रज्ञानानुसार पूर्ण स्क्रिनवर कुठेही टच केलं की अनलॉक होणार आहे. हे तंत्रज्ञान फिंगरप्रिंटच्या तुलनेचे सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे.

सॅमसंगचं नवं तंत्र कधीपर्यंत स्मार्टफोनमध्ये येईल याबाबत माहिती नाही. मात्र ओपीडी (ऑर्गेनिक फोटो डायोड) मल्टी-फिंगरप्रिंट स्कॅनिंग तयार झालं आहे. हे नवं तंत्रज्ञान 2025 ला लाँच केलं जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : सांगलीतून बाळाला उचललं अन् चिपळूणमध्ये एक लाख ८० हजारांना सौदा, पण माय लेकाच दोरी घट्ट होती...

Nagpur Farmer: ५६ हजारांवर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच; अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, दिवाळीनंतरही मदतीपासून वंचित

Latest Marathi News Live Update : अखेर बंजारा आंदोलक विजय चव्हाण यांचे आमरण उपोषण मागे

कबाली हत्तीनं अडवला रस्ता, १८ तास वाहतूक ठप्प; वाहनांच्या रांगा, VIDEO VIRAL

AUS vs IND: जरा इकडे ये ऐक... विराट कोहलीने कॅप्टन शुभमन गिलला हात धरून मागे खेचलं अन् मग...; Video Viral

SCROLL FOR NEXT