samsung galaxy a04 and galaxy a04e launched in india with 50mp camera price features
samsung galaxy a04 and galaxy a04e launched in india with 50mp camera price features  
विज्ञान-तंत्र

एकत्र लॉन्च झाले सॅमसंगने दोन परवडणारे स्मार्टफोन, मिळतं 50MP कॅमेरासह बरंच काही

सकाळ डिजिटल टीम

स्मार्टफोन ब्रँड Samsung ने आज 19 डिसेंबर रोजी भारतात दोन नवीन परवडणारे फोन Samsung Galaxy A04 आणि Galaxy A04e लॉन्च केले आहेत. 8 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम, 4G कनेक्टिव्हिटी आणि अँड्रॉइड 12 या दोन्ही फोनमध्ये सपोर्ट आहे.

Samsung Galaxy A04 मध्ये ड्युअल 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप दिला आहे, तर Samsung Galaxy A04e मध्ये ड्युअल 13 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5,000 mAh ची बॅटरी उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया Samsung Galaxy A04 आणि Galaxy A04e ची किंमत आणि फीचर्स...

Samsung Galaxy A04 आणि Galaxy A04e ची किंमत

Samsung Galaxy A04 हा फोन ग्रीन, कॉपर आणि ब्लॅक कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. 4 जीबी रॅम असलेल्या 128 जीबी स्टोरेजची किंमत 12,999 रुपये आहे, तर फोनच्या 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेजची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Samsung Galaxy A04e लाइट ब्लू आणि कॉपर कलर पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

फोन तीन स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. Samsung Galaxy A04e ची 3 GB RAM सह 32 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,299 रुपये आहे, 3 GB रॅम सह 64 GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 9,999 रुपये आणि 4 GB रॅम सह 128 GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 11,499 रुपये आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअरवरून 20 डिसेंबरपासून खरेदी करता येईल.

हेही वाचा - ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

Samsung Galaxy A04 ची फीचर्स आणि कॅमेरा

Samsung Galaxy A04 मध्ये 6.5-इंच एचडी प्लस डिस्प्लेसाठी सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर आणि 8 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट उपलब्ध आहे. फोनसोबत हाय सेक्युरिटीसाठी फेस रेकग्निशन आणि फास्ट डिव्हाईस अनलॉक सपोर्ट देण्यात आला आहे. ड्युअल 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनसोबत 5,000 mAh बॅटरी आणि टाइप-सी फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Samsung Galaxy A04e चे फीचर्स आणि कॅमेरा

Samsung Galaxy A04e मध्ये 6.5-इंच एचडी प्लस डिस्प्लेसाठी देखील सपोर्ट दिल आहे. Galaxy A04e सह MediaTek Helio P35 प्रोसेसर आणि 8 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट उपलब्ध आहे. फोनमध्ये ड्युअल 13 मेगापिक्सल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळतो.

फोनमध्ये हाय सेक्युरिटीसाठी फेस रेकग्निशन आणि फास्ट डिव्हाइस अनलॉक सपोर्ट दिला आहेत. या फोनसोबत 5,000 mAh बॅटरी आणि टाइप-सी फास्ट चार्जिंग सपोर्टही उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल कंपनीचा दावा आहे की फोनमध्ये AI पॉवर मॅनेजमेंट सिस्टम देण्यात आली आहे, ज्यामुळे फोनला 3 दिवसांची बॅटरी लाइफ मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT