samsung main.png
samsung main.png 
विज्ञान-तंत्र

सॅमसंगच्या स्मार्टफोन्सवर तब्बल 3 हजारापर्यंत डिस्काऊंट, एकापेक्षा एक जबरदस्त ऑफर

सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर मिळत आहेत. Samsung  Galaxy M51, Samsung Galaxy M21, Samsung Galaxy F41, Samsung Galaxy M31s समवेत अनेक स्मार्टफोन्सवर 3000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळत असल्याचे वृत्त 91 मोबाइल्सच्या एका अहवालात म्हटले आहे. नव्या डिस्काऊंटेड प्राइस आणि एक्सचेंज बोनसचा फायदा केवळ ऑफलाइन रिटेल आऊटलेट्सवर मिळेल.

8 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काऊंट
त्याचबरोबर सॅमसंग आकर्षक अपग्रेड ऑफरही देत आहे. जे नवीन सॅमसंग गॅलेक्सी फोन खरेदी करताना आपला जुना हँडसेट एक्सचेंज करतील त्यांना या ऑफरचा फायदा मिळेल. ग्राहकांना कमाल 8000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काऊंट मिळू शकेल. MyGalaxy ऍपच्या माध्यमातून हे चेकही करता येईल. परंतु, एकच IMEI नंबरचा वापर करताना एक्सचेंज ऑफरला Paytm आणि HDFC ऑफर्सशी जोडता येणार नाही. हा प्रमोशनल सेल 19 जानेवारी ते 24 जानेवारी 2021 पर्यंत वैध असेल. 

हेही वाचा- Nokia 5.3 स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी, मोबाइलवर बंपर सूट
 
डिस्काऊंटनंतर इतकी असेल किंमत
या रिपोर्टनुसार, डिस्काऊंटनंतर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणारा Samsung Galaxy M51 स्मार्टफोन 20,249 रुपये मिळेल. या व्हेरियंटवर 2750 रुपयाचे डिस्काऊंट मिळत आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी एम 51 स्मार्टफोनचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटवर 1500 रुपयांचे डिस्काऊंट मिळत आहे. डिस्काऊंटनंतर हा फोन 16,499 रुपयांत मिळत आहे. तर या फोनचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंट डिस्काऊंटनंतर 18,499 रुपयांना मिळेल. 

Samsung Galaxy M31 स्मार्टफोनचा 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरियंट 2000 रुपयाच्या डिस्काऊंटनंतर 14,499 रुपयांत मिळत आहे. तर या फोनचा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंट 3000 रुपयांच्या डिस्काऊंटनंतर 12,999 रुपयांत मिळत आहेत. फोनचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंट 16,499 रुपयांत मिळत आहे. सॅमसंग गॅलेक्सी एफ 41 चा 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरियंट 3000 रुपयांच्या डिस्काऊंटनंतर 11,999 रुपयांना मिळेल. तर फोनचा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजचा फोन 12,999 रुपयांत मिळत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT