ChatGPT Please Thank You tens of millions of dollars mean in crore esakal
विज्ञान-तंत्र

Please Thanks : तुम्ही ChatGPTला 'प्लीज' अन् 'थँक यू' म्हणणं पडतंय महागात! OpenAIचं होतंय 1 ते 9 कोटींपर्यंत नुकसान, नेमका विषय काय?

ChatGPT Please Thank You tens of millions of dollars mean in crore : वापरकर्त्याने ChatGPT "प्लीज" आणि "थँक यू" म्हणल्यास कंपनीवर कोट्यवधींचा खर्च होतो, अशी माहिती OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनी दिली आहे.

Saisimran Ghashi

ChatGPT Please Thank You : सध्या जगभरात लोकप्रिय असलेल्या ChatGPT सारख्या एआयशी संवाद साधताना आपण जाणीवपूर्वक "प्लीज" आणि "थँक यू" म्हणतो. सौजन्य दाखवणं ही सुसंस्कृततेची खूण मानली जाते, पण OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांच्या मते, हे सौजन्य कंपनीला दरवर्षी कोट्यवधी डॉलर्सचा खर्च करायला लावतं.

ऑल्टमन यांनी ‘X’ (पूर्वीचं ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत सांगितलं की, जेंव्हा वापरकर्ते AI ला सौजन्याने विचारतात म्हणजे "कृपया" किंवा "धन्यवाद" असे शब्द वापरतात तेव्हा त्या प्रश्नांची भाषा अधिक गुंतागुंतीची असते. त्यामुळे ती प्रक्रिया अधिक GPU (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स) वापरते आणि त्यासाठी अधिक विजेचा वापर होतो. या सर्वाचा सरळ परिणाम म्हणजे जास्त आर्थिक आणि पर्यावरणीय खर्च.

एक अंदाजानुसार, एका एआय संवादासाठी सरासरी 0.14 किलोवॅट तास वीज लागते म्हणजे सुमारे 14 LED बल्ब एक तास पेटवण्याइतकी. जगभरात दररोज कोट्यवधी संवाद एआयसोबत होत असल्याने याचा संपूर्ण वीज वापरावर मोठा प्रभाव पडतो. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (IEA) आकडेवारीनुसार, डेटा सेंटर्स सध्या जागतिक वीज वापराच्या सुमारे 2% भागासाठी जबाबदार आहेत आणि एआय वापर वाढल्यास हा आकडा आणखी वाढू शकतो.

तरीही ऑल्टमन म्हणतात की हा खर्च "योग्य कारणासाठी" आहे. ते म्हणाले, "पण तुम्हाला माहिती नाही, पुढे कधी कामी येईल."

AI सॉफ्टवेअर डिझायनर कर्टिस बीव्हर्स यांच्या मते, हे शब्द वापरल्यास AI देखील सौम्य आणि सहकार्यशील प्रतिसाद देतो. त्यामुळे हे संवाद अधिक सकारात्मक बनतात आणि कार्यक्षमता वाढते. एका 2024 च्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, अमेरिकेत 67% लोक एआयशी सौजन्याने संवाद साधतात. त्यातील 12% जणांनी चेष्टेत सांगितलं की, भविष्यात AI चा उठाव झाला, तर आपण वाचू शकतो!

AIचा वापर वाढत असताना कंपन्या संवाद अधिक कार्यक्षम कसा बनवायचा यावर काम करत आहेत. भविष्यात कदाचित वापराच्या पद्धतीनुसार दर किंवा सेटिंग्ज ठरवली जाऊ शकतात. पण आत्तासाठी तरी, "प्लीज" म्हणणं महागात पडतंय. पण ते आपल्या संवादाची पातळी उंचावते, हे मात्र नक्की!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update: पुण्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग; जंगली महाराज रोडवर जुने वृक्ष कोसळले, वाहतूक कोंडीची शक्यता

IMD Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ओसरला; पाऊस थांबणार, मुंबईसह घाटमाथ्यांवर इशारा

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाचा जोर ओसरला

Pune Flood Alert: पुण्यात पूरस्थितीची चाहूल! खडकवासलातून मोठा विसर्ग, एकतानगरातील दोन सोसायट्यांत पाणी शिरले, महापौर नागुपरेंची पाहणी

Ashadhi Wari: ४३ वर्षांची अखंड परंपरा कायम! गंगापूरहून १२०० वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ; भक्ती, शिस्त आणि परंपरेचा अनोखा संगम

SCROLL FOR NEXT