Second-Hand Car esakal
विज्ञान-तंत्र

Second-Hand Car : सेकंड हँड कार घेताय की, क्रिमिनल्सला पडताय बळी? आधी या गोष्टींची करा खात्री

कार हे बऱ्याच लोकांच स्वप्न असतं तर सध्या काळाची गरजही.

धनश्री भावसार-बगाडे

Things To Check Before Buying Second Hand Car : कार घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि त्यातही सध्याच्या काळाची ती गरजही झाली आहे, असं म्हणता येईल. पण प्रत्येकालाच नवी कार खरेदी करणं शक्य नसतं. अशावेळी जर तुम्ही सेकंड हँड कार खरेदी करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर आधी ही बातमी नक्की वाचा.

सेकंड हँड कारचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. एका डेटानुसार वेगवेगळ्या कार्सचा बाजार आजवर साधारण २३ अरब डॉलर्सचा आहे. त्यामुळेच हा डेटा गुन्हेगारांनाही आपल्याकडे आकर्षित करत आहे. त्यामुळेच या सेकंड हँड बाजाराला क्रिमिनल्सने आपला अड्डा बनवला आहे.

कार चोरणाऱ्या टोळी

सध्या देशात कार चोरणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत. यांचे काम वेगवेगळ्या ठिकाणच्या कार चोरणे हे आहे. ज्या फार जुन्या कार चोरी होतात त्या भंगारात विकल्या जातात. पण नवीन कार्स पुन्हा विकण्याचा प्रयत्न केला जातो. गाजियाबादमध्ये पोलिसांनी अशाच एका टोळीचा भांडा फोड केला आहे जी कार चोरून OLX वर विकत होती. हे लोक नंबर प्लेट बदलून ओएलएक्सवर कार्सच्या जाहिराती टाकत होते.

पोलिसांनी पकडली टोळी

याची भनक पोलिसांना लागताच त्यांनी या टोळीच्या म्होरक्यासह ४ लोकांना ताब्यात घेतलं आहे. या टोळीने अशा ८ कार्सच्या नंबर प्लेट बदलून त्यांना OLXवर विक्रीसाठी टाकले होते. यात स्कॉर्पिओ, फॉर्च्युनरसारख्या साधारण ८ लग्झरी कार्सचा समावेश होता. ही गँग चोरीनंतर इंजिन आणि चॅल्सी नंबर घासून त्याचे डुप्लिकेट कागदपत्र बनवत होती. मग हे लोक चोरीच्या या कार्स थोड्या स्वस्त दरात विकत होते. त्यामुळे लोक ते सहज विकत घेत असे. यासर्व गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

एकच कार १२ वेळा OLX वर विकली

या पूर्वीही OLX वर एकच कार १२ वेळा विकण्याचे प्रकरण समोर आले होते. एका माणसाने आपल्या मित्राच्या कारला या साइटवर जाहिरात देऊन १२ वेळा विकले होते. त्यांनी कारमध्ये एक चीप लावली होती. उत्तर प्रदेशच्या अमरोहाचा हा माणूस या साइटच्या माध्यमाने ही कार विकायचा आणि त्या चिपच्या माध्यामाने कारचं लोकेशन माहीत करून चोरून घेत असे. मग पुन्हा दुसऱ्या माणसाला विकत असे. पोलिसांनी नोएडा सेक्टर २२ मधून त्याला अटक केली होती.

चोरीच्या बाईकपण ऑनलाइन विकल्या जातात

महाराष्ट्रात चंद्रपूरमध्येही अशाच एका माणसाला अटक करण्यात आली होती. राहुल कुमार नावाचा व्यक्ती वेगवेगळ्या भागातून बाईक चोरी करायचा. नंबर प्लेट बदलून नकली कागदपत्र बनवून सहज ओएलएक्सवर विकायचाय चोरीच्या ३-४ बाईक त्याने आधीच विकल्या होत्या. या माणसाचा सुगावा पोलिसांना इंश्युरंस पॉलिसी रिन्युअलद्वारे मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT