Apple Conned
Apple Conned eSakal
विज्ञान-तंत्र

Apple Conned : सिक्युरिटी रिसर्चरने अ‍ॅपलला असं गंडवलं, की कंपनीलाही समजलं नाही! उलट त्याच्याच कामाचं केलं कौतुक...

Sudesh

Security Researcher Conned Apple : अमेरिकेतून एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्या सिक्युरिटी रिसर्चरच्या चांगल्या कामाचं कौतुक अगदी अ‍ॅपल कंपनीने देखील केलं होतं, त्याच व्यक्तीने कंपनीला तब्बल 2.5 मिलियन डॉलर्सचा चुना लावला आहे. 404 मीडिया या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

नोआह रॉस्किन-फ्राझी (Noah Roskin-Frazee) असं या रिसर्चरचं नाव आहे. तो झीरोक्लिक्स (ZeroClicks) लॅब या कंपनीसोबत काम करत होता. मोठमोठ्या कंपन्या आपल्या सुरक्षा व्यवस्थेतीत त्रुटी शोधण्यासाठी अशा रिसर्चर्सना काम देतात. आपल्या कामासाठी नोआह मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होता. त्यामुळेच अ‍ॅपल कंपनीने देखील त्याला काम दिलं होतं.

विशेष म्हणजे, चांगलं काम केल्याबद्दल अ‍ॅपल कंपनीने त्याला एक ई-मेल देखील लिहिला होता. "नोआह आणि प्रो. जे (झीरोक्लिक्स एआय लॅब) या दोघांनी आमची भरपूर मदत केली" अशा आशयाचा हा मेल होता. मात्र, हा मेल येण्याच्या दोन आठवड्यापूर्वीच नोआहला अटक करण्यात आली होती. (Apple Conned by Researcher)

कसं गंडवलं कंपनीला?

अ‍ॅपलच्या टूलबॉक्स या बॅकएंड सिस्टीममध्ये नोआहला एक त्रुटी सापडली होती. याची माहिती त्याने कीथ लॅटेरी नावाच्या आणखी एका रिसर्चरला दिली. त्यानंतर या दोघांनी मिळून कंपनीच्या बॅकएंडवर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले केले. काही दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर त्यांना टूलबॉक्सचा अ‍ॅक्सेस मिळाला.

यानंतर त्यांनी अ‍ॅपलच्या कस्टमर सपोर्टसोबत काम करणाऱ्या एका थर्ड पार्टी कंपनीच्या कर्मचाऱ्याचं अकाउंट हॅक केलं. या अकाउंटची मदत घेऊन, खोट्या प्रोफाईल्सच्या मदतीने या दोघांनी विविध प्रकारचे अ‍ॅपल प्रोडक्ट्स मागवले. प्रत्येक वेळी प्रोडक्ट मागवताना ते टूलबॉक्सच्या मदतीने वस्तूंचं टोटल बिल शून्य रुपये करत होते. यामुळे सर्व वस्तू मोफतच त्यांच्याकडे डिलिव्हर होत होत्या. अशाच प्रकारे त्यांनी सुमारे 2.5 मिलियन डॉलर्स किंमतीचे आयफोन, मॅक आणि गिफ्ट कार्ड्स मागवले.

अशी पकडली चोरी

या दोघांपैकी एकाने अ‍ॅपल केअरचं चोरलेलं सबस्क्रिप्शन हे स्वतःपुरतं मर्यादित नाही ठेवलं. 'चोरीचा मामला हळू-हळू बोंबला' असं न करता, त्याने हे सबस्क्रिप्शन आपल्या स्वतःच्या अकाउंटशी आणि कुटुंबीयांच्या अकाउंटशी देखील लिंक केलं. यामुळे मग ही चोरी पकडली गेली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT