Shubhanshu Shukla after completing his 18-day space mission, showcasing samples and data collected from orbit.  esakal
विज्ञान-तंत्र

Shubhanshu Shukla 18 Days in Space: शुभांशु शुक्लांनी अंतराळात १८ दिवस कसे घालवले, नेमकं काय-काय केलं अन् सोबत काय आणलं?

Shubhanshu Shukla Space Journey Highlights: शुभांशु शुक्ला यांनी दररोज १६ सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिले कारण...

Mayur Ratnaparkhe

How Shubhanshu Shukla spent 18 days in space: भारताच्या दृष्टीने आजचा दिवस फार महत्त्वाचा आणि तितकाच अभिमानाचा देखील आहे. कारण, विशेष मोहिमेवर १८ दिवसांसाठी अंतराळात गेलेले भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज(मंगळवार) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत. तर या १८ दिवसांमध्ये शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात नेमकं काय काय केलं? हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे, त्याबाबतची माहिती आता समोर आली आहे.

 शुभांशु शुक्ला आणि त्यांचे इतर तीन सहकारी अंतराळवीरही 'अ‍ॅक्सिओम-४' मोहिमेअंतर्गत आयएसएसमध्ये १८ दिवस घालवल्यानंतर पृथ्वीवर परतले आहेत. खरंतर अंतराळाच्या प्रवासाला निघण्यापूर्वी अ‍ॅक्सिओम मिशन-४ अनेक वेळा पुढे ढकलण्यात आले होते. अखेर त्यानंतर अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेचा अंतराळ प्रवास २५ जून रोजी सुरू झाला होता. हे अभियान भारत, पोलंड आणि हंगेरीसाठी खूप महत्त्वाचे आहे.

नासाने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, अ‍ॅक्सिओम मिशन-४ वर गेलेल्या अंतराळवीरांनी त्यांच्यासोबत सामानात अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणल्या आहेत, ज्यामध्ये नासाचे हार्डवेअर आणि महत्त्वाचा डेटा समाविष्ट आहे. त्यांनी आणलेला हा डेटा या अंतराळवीरांनी मोहिमेदरम्यान केलेल्या ६० हून अधिक प्रयोगांचा आहे. हे अंतराळवीर सुमारे ५८० पौंड सामान घेवून पृथ्वीवर परतले आहेत.

शुभांशु शुक्ला यांनी अंतराळात १८ दिवसांमध्ये दररोज १६ सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिले कारण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) पृथ्वीपासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या कक्षेत २८,००० किलोमीटर प्रति तास वेगाने फिरत होते. तसेच शुभांशु शुक्ला आणि टीममधील इतर अंतराळवीरांनी अंतराळात १४ दिवस अनेक वैज्ञानिक संशोधन केले.  ज्यामध्ये अंतराळात मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे समाविष्ट आहे . एकूण संपूर्ण टीमने ३१ देशांमधून ६० प्रयोग केले, ज्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाला पुढे नेण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग समाविष्ट आहेत.

शुभांशु शुक्ला यांनी कोणते प्रयोग केले? -

शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर हरभरा, मेथी आणि मूगाचे बियाणे वाढवले आहे. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये वनस्पतींच्या बिया कशा अंकुरतात आणि वाढतात हे पाहण्याच्या उद्देशाने केलेल्या संशोधनाचा हा एक भाग होता. त्यांनी ISS वर पेट्री डिशमध्ये मूग आणि मेथीचे बियाणे अंकुरित केले आणि नंतर ते ISS वरील एका स्टोरेज फ्रीजरमध्ये ठेवले. या प्रयोगांतर्गत, या बियाण्यांपासून वाढलेल्या वनस्पतींच्या अनुवंशशास्त्र, सूक्ष्मजीव परिसंस्था आणि पौष्टिक प्रोफाइलमध्ये कोणते बदल होतात हे देखील पाहिले जाईल. 

 याशिवाय, शुभांशु शुक्लाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अद्वितीय सूक्ष्म-गुरुत्वाकर्षण प्रयोग केले, जे भारताच्या अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानातील वाढत्या क्षमतांचे प्रदर्शन होते. हे प्रयोग भविष्यातील ग्रह मोहिमा आणि दीर्घकाळाच्या अंतराळ मुक्कामासाठी महत्त्वाचा डेटा प्रदान करण्यासाठी होते.

तसेच, शुभांशु शुक्ला यांनी दुसऱ्या एका प्रयोगात सूक्ष्म-शैवाळाचाही वापर केला आहे. ज्याचा वापर अन्न, ऑक्सिजन आणि जैवइंधन तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे संशोधन भविष्यात अवकाशात शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT