BSNL Tower eSakal
विज्ञान-तंत्र

BSNL Tower : सीमेवर तैनात सैनिकांना मिळणार फुल नेटवर्क, BSNL आणि भारतीय सैन्याने 15,000 फूट उंचीवर उभारला BTS टॉवर

BTS Tower : या BTS टॉवरमुळे सैनिकांना रिअल टाईम इमर्जन्सी सिग्नल्स मिळू शकणार आहेत.

Sudesh

सीमेवरील डोंगराळ भागात तैनात असणाऱ्या सैनिकांना आता अधिक चांगली वायरलेस कम्युनिकेशन सेवा मिळणार आहे. यासाठी भारतीय सैन्य आणि BSNL ने चक्क 15,500 फूट उंचीवर एक बेस ट्रान्स रिसीव्हर उभारला आहे. याचा फायदा डोंगराळ भागात असणाऱ्या सैनिकांना होणार आहे.

या BTS टॉवरमुळे बर्फाळ डोंगरांमध्ये सीमेचं रक्षण करत असलेले सैनिक एकमेकांशी अधिक सुलभतेने आणि स्पष्टपणे संपर्क साधू शकणार आहेत. तसंच या सैनिकांना रिअल टाईम इमर्जन्सी सिग्नल्स मिळू शकणार आहेत. सियाचीन योद्धांनी उभारलेल्या या टॉवरचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

अशा प्रकारची कामगिरी करण्याची ही BSNL ची पहिलीच वेळ नाही. बीएसएनएलने यापूर्वी कित्येक वेळा भारताच्या अतिदुर्गम भागामध्ये मोबाईल नेटवर्क सेवा पुरवली आहे. भारतीय सेनेसोबत मिळून BSNL ने दुर्गम भागात टॉवर उभारण्याचे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

पुढच्या योजना

भारत संचार निगम लिमिटेड, म्हणजेच BSNL हे येत्या काळात उत्तरकाशीमधील दुर्गम भागांमध्ये मोबाईल टॉवर उभारणार आहे. भारत-चीन सीमेवरील नेलांग, जादुंग आणि इतर गावांमध्ये असे टॉवर उभारण्यात येणाार आहेत. भारतीय सैनिकांना अधिक चांगली कम्युनिकेशन सुविधा मिळावी यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.

यासाठी या गावांमध्ये बीएसएनएलला जमीन उपलब्ध करून दिली आहे. काही ठिकाणी टॉवरची निर्मिती देखील सुरू झाली आहे. यामुळे आयटीबीपी आणि बीआरओच्या जवानांना तसेच भारतीय लष्कराला मोठा फायदा होणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा अन् अण्‍णासाहेब डांगे यांचा प्रवेश; नेमका काय योगायोग?

Sikkim Nomad Village: ‘डिजिटल नोमॅड व्हिलेज’ची सुरूवात सिक्कीममध्ये; याकतेन गावातून ग्रामीण पर्यटनाला नवा प्रवास

स्वच्छतेबाबतीतली समाजातली अनास्था दाखवणाऱ्या 'अवकारीका' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पथनाट्याने रंगला सोहळा

Menstrual Pain Relief: मासिक पाळीत वारंवार त्रास होतोय? तूप-पाणी आणि 'ही' 4 योगासने देतील नैसर्गिक आराम

'संत्या या गोष्टी सोडून दे' विकी कौशलने दिला संतोष जुवेकरला सल्ला! ट्रोलिंगवर म्हणाला, "संत्या तू आमच्यापेक्षा...."

SCROLL FOR NEXT