Smartphone Tips
Smartphone Tips esakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Tips : स्पॅम कॉलच्या कटकटीमुळे आलाय वैताग? तुमच्यासाठी खास टिप्स

सकाळ डिजिटल टीम

Smartphone Tips : प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळतो. बहुतांश लोकं ड्युअल सिमकार्ड असलेला स्मार्टफोन वापरतात. त्यामुळे स्पॅम कॉलचा त्रास सर्वाधिक होतो. कधी लोनसाठी, तर कधी इंश्युरन्ससाठी कॉल येतात. वैतागून अनेक जण हे नंबर ब्लॉक करतात. असं केलं तरी दुसऱ्या नंबरवरून कॉल येण्यास सुरुवात होते.

कॉल्स आणि एसएमएसमुळे अनेक जण फिशिंगचेही बळी ठरले आहेत. फसवणूक करणाऱ्यांना एसएमएसमध्ये अडकवण्यासाठी लॉटरी आणि मोफत ऑफरचे आमिष दाखवले जाते. काही लोक सापळ्यात अडकतात आणि बँक तपशील शेअर करतात. यामुळे त्यांचे बँक खाते काही मिनिटांतच रिकामे होते.

तुम्हीही अशाच अडचणींना सामोरं जात असाल तर, टेन्शन घेण्याची गरज नाही. कोणता कॉल स्पॅम आहे हे पाहण्यासाठी Android आणि iOS डिव्हाइसमध्ये पर्याय उपलब्ध आहे. तसेच, त्यांना ब्लॉक करण्याची परवानगी देखील आहे. Google चे फोन अॅप आजकाल बहुतेक Android स्मार्टफोन्सवर डीफॉल्ट कॉलिंग अॅप म्हणून येते. बजेट असो, मिड-रेंज किंवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, स्पॅम कॉल्सचा अनुभव सारखाच असतो.

नको असलेले कॉल कसे ब्लॉक करावे ? या अ‍ॅप्सच्या माध्यमातून स्पॅम कॉल ब्लॉक करा

Truecaller : हे अ‍ॅप सर्वाधिक वापरले जाते. हे अ‍ॅप अनोळखी कॉल ओळखण्यात मदत करते. फसवणूक कॉल आणि स्पॅम कॉल शोधते आणि आधीच सूचना देते. या अ‍ॅपद्वारे तुम्ही कोणताही नंबर ब्लॅकलिस्ट आणि ब्लॉक करू शकता.

Should I Answer? : हे अ‍ॅप देखील एक उत्तम पर्याय आहे. या अ‍ॅपमध्ये स्पॅम नंबर्सचा मोठा डेटाबेस आहे, जो सतत अपडेट केला जातो. जर कोणी कॉल करण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांना आपोआप ब्लॉक करेल. या अ‍ॅपद्वारे आंतरराष्ट्रीय कॉल्सही ब्लॉक केले जाऊ शकतात.

Calls Blacklist : हे देखील एक उत्तम अ‍ॅप आहे. अ‍ॅप कॉल आणि एसएमएस संदेश दोन्हीसाठी कॉल ब्लॉकर आहे.

Call Blocker : या अ‍ॅपद्वारे कॉल सेंटर, स्पॅम नंबर, रोबोकॉल, टेलीमार्केटिंग इत्यादींवरील अनोळखी कॉल ब्लॉक करण्याचे उत्तम काम करते.

आयफोनवर कॉल कसे ब्लॉक करावे ?

आयफोनवर कॉल ब्लॉक करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला सेटिंग अॅपवर जावे लागेल. नंतर फोन ऑप्शन मध्ये जा. आता तुम्हाला सायलेन्स अननोन कॉलर चालू करावा लागेल. मात्र, यामुळे तुमचे काही महत्त्वाचे कॉल चुकतील. यासाठी तुम्ही दुसरी पद्धत देखील अवलंबू शकता. तुम्ही Truecaller वर जाऊन कॉल ब्लॉकिंग आणि आयडेंटिफिकेशन चालू करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT