NASA
NASA esakal
विज्ञान-तंत्र

NASA : सुर्याचा रंग पिवळा नाही तर पांढरा ; नासाने केला खुलासा

सकाळ डिजिटल टीम

NASA : निसर्गचित्र काढताना आजवर सुर्याला पिवळा रंग आपण देत आलो. पण, आता सुर्य पिवळा नाही तर, भलत्याच कोणत्यातरी रंगाचा असल्याचा खुलासा नासाच्या (National Aeronautics and Space Administration, NASA) संशोधकांनी केला आहे. अंतराळाशी संबंधित अनेक रहस्ये असून आजपर्यंत मानव त्या रहस्यापर्यंत पोहोचू शकलेला नाही. पृथ्वीवरून आपण आकाशाकडे पाहत राहतो आणि आपले आकाशगंगा कशी असेल याचे चित्र रंगवतो.

अंतराळाबद्दलच्या प्रत्येक गोष्टीची माहीती आपल्याला अजून नाही. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी दिसत नाहीत. त्यांचे तर सोडाच पण, अंतराळातील ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्यांच्यावरचे अंदाजही खोटे ठरू शकतात.

सूर्य पृथ्वीवरून पिवळा दिसत असला तरी प्रत्यक्षात त्याचा रंग पांढरा आहे. सुर्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरून पिवळा दिसतो. असे, नासाचे अंतराळवीर स्कॉट केली यांनी सांगितले. १२ सप्टेंबर रोजी @Latest in Space या ट्विटर हँडलवरून त्यांनी ट्विट केले. स्कॉट केली यांनी ५२० दिवस १० तास ३३ मिनिटे अंतराळात घालवली आहेत.

म्हणून सुर्य पिवळा दिसतो

जेव्हा अंतराळवीर अवकाशात पोहोचतात तेव्हा त्यांना सूर्य पांढरा दिसतो. आता प्रश्न असा आहे की आपल्याला पृथ्वीवरून सूर्य पिवळा का दिसतो? याचे कारण आहेत आपले डोळे. आपल्याला सूर्याचा कोणताही एक रंग दिसत नाही कारण आपल्या डोळ्यांच्या फोटोरिसेप्टर सेल्स (Photoreceptor Cells) सूर्यप्रकाशाला सॅच्युरेट करतात. यामुळे सर्व रंग एकत्र मिसळतात. जेव्हा सर्व रंग मिसळले जातात तेव्हा पांढरा तयार होतो.

पृथ्वीच्या वातावरणामुळे आपल्याला सूर्याचा रंग पिवळा दिसतो. सायन्स फोकस( Science Focus) च्या मते ब्लू लाइट ची वेबलेंथ कमी असते आणि ती रेड लाइटपेक्षा चांगली पसरते.

सुर्याचा लाल केशरी रंग

सूर्य उगवत असतो किंवा मावळत असतो तेव्हा तो क्षितीजापासून सर्वात जवळच्या बिंदूवर असतो. त्यामुळं सूर्यकिरणे मोठ्या प्रमाणात हवामानाच्या रेणूंमधून प्रवास करतात. त्यामुळं निळ्या छटा असलेल्या रंगामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतात आणि त्यामुळं मोठ्या तरंगलांबीतील लाल आणि केशरी रंगाचं सूर्याच्या प्रतिमेवर प्रभाव पाहायला मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

SCROLL FOR NEXT