Carl Sagan
Carl Sagan esakal
विज्ञान-तंत्र

गोष्ट 1990 ला अंतराळातून 600 करोड किमी अंतरावरून काढलेल्या फोटोची

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

आज कार्ल सेगनच्या स्मृतीदिनी प्रत्येकानंच एकदा अंतर्मुख होऊन हे सगळं वाचावं असं वाटलं म्हणून हा प्रपंच. त्यांना विनम्र अभिवादन!

१४ फेब्रुवारी १९९० ला अंतराळातून ६०० करोड किमी अंतरावरून एक छायाचित्र (Photograph) काढलं गेलं त्याचं नाव ‘फिकट निळा ठिपका’ (Pale Blue Dot). आज या फिकट निळ्या ठिपक्याचीच गोष्ट सांगतो पण दस्तुरखुद्द कार्ल सेगनच्या भाषेत. या छायाचित्राबद्दल ‘कार्ल सेगन’ (Carl Sagan) म्हणतो, अंतराळातील या खोलवर दूर अंतरावरून ‘पृथ्वी’(Earth)हा कदाचित फार रंजक प्रकार आहे असं बिल्कुल वाटणार नाही पण आपल्यासाठी या सगळ्याचे ‘संदर्भ’फार वेगळे आहेत. या छायाचित्रातल्या फिकट निळ्या ठिपक्याला पुन्हा एकवार बघा. हा इथं ये-हा आपलं घर आहे-हा आपण आहोत. प्रत्येक व्यक्ती जिच्यावर आपण प्रेम करतो वा ओळखतो-ते प्रत्येक व्यक्तिमत्व ज्याचाबद्दल आपण ऐकलंय-तो प्रत्येक माणूस जो कधी होता ‘त्या’ सगळ्यांनी या निळ्या ठिपक्यावर आपलं संपुर्ण आयुष्य घालवलंय.

आपले सगळे आनंदक्षण (Happy moment),सगळी दुःखं, विश्वासानं भरलेले हजारो धर्म, रुढी, आर्थिक धोरणं (Economic policies), प्रत्येक शिकारी आणि शिकार, प्रत्येक नायक आणि दुर्बल, प्रत्येक राजे आणि त्यांचे गुलाम, संस्कृतीला जन्म देणारा प्रत्येकजण आणि तिच्यावर हल्ला करून तिला नेस्तनाबूत करणारा प्रत्येक हल्लेखोर, प्रेमात आकंठ डुंबलेले प्रेमवीर, प्रत्येक पालक, आशेनं भरलेलं प्रत्येक निरागस मुल, सगळे वैज्ञानिक आणि संशोधक, नीतिमत्तेचा धडा देणारा प्रत्येक शिक्षक, भ्रष्टाचारानं (Corruption)बरबटलेला प्रत्येक राजकारणी, प्रत्येक सुपरस्टार (Superstar), सगळे महान नेते, प्रत्येक साधू आणि पापी, ज्यांनी मानवी संस्कृतीच्या इतिहासाची पानं लिहिलियेत, तो प्रत्येकजण सुर्यकिरणात विहरणाऱ्या एखाद्या धुळीकणासारखा दिसतो. जे या निळ्या ठिपक्यावर जन्माला आले ते तिथं जगले अन् तिथंच संपले. या अनंत ब्रम्हांडात पृथ्वीचं स्थान अक्षरश: ‘नगण्य’आहे. आता त्या निष्ठुर हल्लेखोर आणि सैन्यप्रमुखांबद्दल विचार करा, ज्यांनी या सुक्ष्म ठिपक्याच्या अतीसुक्ष्म भागावर कब्जा मिळवण्याच्या नादात मानवतेला काळीमा फासला आणि रक्ताचे पाट वाहिले. त्या भयावह अत्याचारांना आठवा, जे या ठिपक्याच्या एका टोकावरच्या लोकांनी दुसऱ्या टोकावरच्या लोकांवर केले.

ते एकमेकांप्रती अशा कुठल्या असमंजस अवस्थेत होते की एकमेकांना संपवायला इतके उतावीळ झाले. एकमेकांबद्दल टोकाचा द्वेष, उथळ दिखावा, भंपक अहंकार, फुटकळ अस्मिता आणि हा भ्रम की ब्रम्हांडात आपल्यालाच काहीतरी ‘विशेष दर्जा’ मिळालीय. या सगळया गोष्टींना या छायाचित्रात दिसणारा हा इवलासा ‘फिकट निळा ठिपका’ आव्हान देतोय. ब्रम्हांडातल्या या गुढ काळोखात एकटं फिरणाऱ्या एका धुळीकणासारखा आहे आपला हा ग्रह. या अनंत अवकाशाच्या महाप्रचंड विस्तारात असा कुठला इशाराही मिळत नाही जो आपल्याला स्वत:पासूनच वाचवण्यासाठी कुठूनतरी काहीतरी मदत येईल याबद्दल आश्वस्त करेल.

आजपोवेतो पृथ्वी (Earth) ही अशी एकमेव जागाये जिथं जीवन (Life) फुलतंय, किमान नजिकच्या काळात भविष्यात इतरत्र अशी कुठली जागा दिसत नाही, जिथं आपला मानव समुह राहायला जाऊ शकेल. होय, या पृथ्वीबाहेर काही जागी आपण नक्कीच जाऊन पोहोचलो असलो तरी अद्यापही वास्तव्य मात्र करू शकलो नाही. आता तुम्हाला आवडो वा ना आवडो परंतु, या क्षणी पृथ्वी अशी एकमेव जागा आहे, जिथं आपण राहू शकतो. जिथं जीवन फुलू शकतं. असं म्हणतात की खगोलशास्त्र (Astronomy) माणसाला ‘विनय आणि चारित्र्य’यांच्या निर्मितीचा अनुभव देतं. अहंकारात आकंठ बुडालेल्या मानवाचं ‘अज्ञान’ उघडं करण्यासाठी या छायाचित्रापेक्षा जास्त प्रत्ययकारी काही नाही. माझ्या मते हे छायाचित्र आपल्यावरच्या जबाबदारीला अधोरेखित करत हे देखील सांगतं की, ”एकमेकांशी प्रेमानं आणि सहनशीलतेनंच वागायला हवं जेनेकरून आपण ‘एकुलतं एक घर’असलेल्या आपल्या या फिकट निळ्या ठिपक्याला संरक्षित करण्यासोबतच अधिक सुंदर जीवन जगायलाही लायक बनवू शकू”.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT