dr har gobind khorana
dr har gobind khorana esakal
विज्ञान-तंत्र

जेनेटिक कोडवर विशेष संशोधन करणाऱ्या 'डॉ. हरगोविंद खुराणा' यांची कहाणी

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

आज डॉ. हरगोविंद खुराणा यांचा स्मृतीदिन, त्यांना विनम्र अभिवादन !

गोष्ट आहे १९२२ च्या जानेवारी महिन्यातील. तत्कालिन पंजाब प्रांतातल्या ‘रायपूर’ या गावचे पटवारी गणपत राय यांच्या घरी चार अपत्यांच्या पाठोपाठ एक मुल जन्माला आले. ‘शेंडेफळ’ म्हणून या मुलाचे घरात सर्वाधिक लाड झाले आणि तसंही हे मुल स्वभावाने प्रचंड लाघवी असल्याने लवकरच सगळ्यांच्याच गळ्यातला ताईत बनले. सगळे जण येताजाता त्याला ‘गोविंद’ या नावानं पुकारू लागले. गोविंद थोडा मोठा होताच गावातल्या शाळेत त्याचे नाव दाखल करण्यात आले. काही दिवसातच लक्ष्यात आले की या गोविंदची अंकांशी विशेष दोस्ती आहे. त्याने एकेक गणित पटापट सोडवणे आणि घरच्यांनी ते कुतूहलपुर्वक बघणे हे नित्याचं होऊ लागले.

एके दिवशी भुकेला गोविंद जेवणाच्या प्रतिक्षेत आई कृष्णादेवीसोबत स्वयंपाकगृहात बसला होता. तितक्यात आई त्याचाकडे बघत पुटपुटली, "पैज लावतोस का एक?" आईचं वाक्य ऐकून लहानगा गोविंद चपापला. "पण आई तु तर म्हणतेस ना पैज वाईट असते" गोविंदचं उत्तर ऐकून आईच्या चेहऱ्यावर हसू आले. "अरे पण ही पैज इतकी वाईट नाही, साधी आहे" "बोल तर" आधीच भूक त्यात आईची पैज यामुळे व्याकूळ होत आईला बोलला. “हे बघ माझी भाकरी तव्यावरून आधी उतरते की तु तुझं गणित आधी सोडवतो बघूयात आज आपण” “अच्छा असंय होय? हे तर चुटकीसरशी होईल”

आईनं तव्यावर भाकरी टाकली आणि इकडं गोविंद आपलं पहिलं गणित सोडवू लागला. भाकरी झाली पण गणित थोडं बाकी होते. "आई आई थांऽऽब भाकर तर कच्चीये अजूनऽऽ" गोविंदला उत्साह संचारला. आता दुसरी भाकरी टाकली पण गणित आधीच सोडवून झालं. आईच्या भाकरी आणि गोविंदचं गणित स्पर्धा नेहमीची होत केली. गणित म्हटलं की या पोराची तहानभूक हरपून जात असे. आई भाकरी बनवत राही आणि गोविंद गणित सोडवत राही. हा गोविंद दुसरा तिसरा कुणी नसून पुढं १९६८ ला औषधी आणि शरीर क्रियाविज्ञान या विषयात ‘नोबेल’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले ‘डॉ. हरगोविंद खुराणा’ होते. आपल्या शैक्षणिक कालावधीत त्यांनी सगळ्या शिष्यवृत्ती मिळवल्या होत्या, त्यामुळे कुटुंबीयांना त्यांचा शिक्षणाचा खर्च झेपला. फाळणीआधी १९४५ साली त्यांनी पंजाब विद्यापीठातून एमए आणि पाठोपाठ पीएचडी पुर्ण केलं. १९४८ ला भारत शासनाने त्यांना शिष्यवृत्ती देत पुढील शिक्षणासाठी विदेशात पाठवले.

ब्रिटनमध्ये जात 'यूनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपुल' मध्ये काही कोर्सेस बघितल्यानंतर ते स्वित्झर्लंडला रवाना झाले आणि तिथं त्यांना भेटले प्रा.व्लादिमिर प्रॅलॉग. यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांचे उच्चशिक्षण सुलभ झाले. इथल्या मुक्कामात त्यांची भेट एलिझाबेथशीही झाली. एलिझाबेथ सिब्लर दोघं प्रेमात पडले त्यांनी लग्नही केलं. इथं त्यांनी तुटलेल्या मानवी अंगापासून अवयव पुननिर्माणावर यशस्वी प्रयोग केले. १९५२ ला डॉक्टरांना कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातून ऑफर आली आणि त्यांनी स्वित्झर्लंड सोडलं, कारण या विद्यापीठानं त्यांना संशोधनासाठी संपुर्ण स्वातंत्र्य बहाल केलं होतं, जे स्वित्झर्लंडला शक्य नव्हते.

भारतात तर हे जवळपास अशक्य होतं. इथे त्यांनी कृत्रिम गुणसूत्र अर्थात सिंथेटिक जिन्सवर काम सुरू केलं आणि १९६०ला अमेरिका गाठत ‘यूनिव्हर्सिटी ऑफ विस्कोन्सिन’ जॉईन करत आपले संशोधन सुरू ठेवलं. १९६६ला अमेरिकेनं त्यांना नागरिकता बहाल केली, कारण अशी व्यक्ती आपल्याकडे असणे हा त्या देशाचा गौरव होता. लागलीच दोन वर्षांतच त्यांना नोबेल मिळाला. त्यांनी जेनेटिक कोडवर विशेष संशोधन केलं होतं. जेनेटिक कोड म्हणजे फिल्मी भाषेत सांगायचं तर "आपकी रगों में बहता खानदान का खून" विज्ञानाच्या भाषेत ‘वंशानुक्रम’ साहित्यात टागोर आणि भौतिकशास्त्रात सी वी रमण यांच्या पाठोपाठ ‘नोबेल’ मिळवणारे खुराणा हे तिसरे मुलत: भारतीय ठरले. अर्थात अभ्यास-संशोधन ही अविरत प्रक्रिया आहे यानंतरही त्यांनी डोंगराएवढं काम करत ढीगभर मानसन्मान पटकावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT