Boeing Starliner Crew Flight Test esakal
विज्ञान-तंत्र

Boeing Starliner : सुनीता विलियम्सची Starliner अंतराळ मोहीम एवढी महत्वाची का? जाणून घ्या कारण

Sunita Williams in Space : अंतराळ वाहन चालविणारी पहिली महिला म्हणून इतिहासात केले नाव नोंद

Saisimran Ghashi

NASA Mission : अमेरिकेचे अंतराळ वाहन चालविणारी पहिली महिला अशी विक्रमी कामगिरी करत सुनीता विलियम्स अंतराळाच्या प्रवासावर तिसऱ्यांदा रवाना झाल्या आहेत. या मोहिमेमुळे त्या अंतराळात आत्तापर्यंत घालवलेल्या ३२२ दिवसांच्या विक्रमात आणखी भर पडणार आहे.

सुनीता विल्यम्सचं हे मिशन दोन ते तीन वेळा काही कारणास्तव रद्द करण्यात आलेलं होतं. पण अखेर त्यांनी इतिहास रचत ही मोहीम पूर्ण करण्याचा ध्यास सोडला नाही. पण आपल्या सर्वांना नक्कीच एकदा तरी हा प्रश्न पडलाच असेल की हे स्टारलाइनर मिशन एवढे महत्वाचे का आहे? यातून कोणती माहिती मिळणार आहे किंवा कोणता नवा शोध लागणार आहे. तर ही नासाची मोहीम अत्यंत महत्वपूर्ण आहे.

बोइंगच्या स्टारलाइनर या अंतराळयानाचे यशस्वीरीत्या चालविण्याचा मान त्यांना मिळाला असून त्यांनी हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station - ISS) पोहोचवले आहे. या मोहिमेदरम्यान अंतराळवीरांचे सहकारी बButch विल्मोर आणि सुनीता विलियम्स एक आठवडा या उडणाऱ्या प्रयोगशाळेत विविध चाचण्या घेऊन अंतराळयानाची कार्यक्षमता आणि ताकद पाहणार आहेत.

हे स्टारलाइनर यान अमेरिकेच्या नासाच्या व्यावसायिक अंतराळ कार्यक्रमाचा (Commercial Crew Program) एक भाग आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेमुळे भविष्यात अंतराळ प्रवास अधिक सोपा होईल आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नियमित अंतराळ प्रवास शक्य होईल अशी आशा आहे.

सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सोबत गेलेले त्यांचे अंतराळसोबती विल्मोर जेव्हा परततील त्यावेळेस खरं काय काय नवीनतम गोष्टी समजतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! २९ महापालिकांचं बिगुल आज वाजणार, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

IPL 2026 Auction live : ७७ खेळाडूंचं नशीब बदलणार, २३७.५५ कोटींचा पाऊस पडणार... ऑक्शन केव्हा, कुठे व किती वाजता होणार; जाणून घ्या सर्व माहिती

New Year 2026 Trip Idea: नवीन वर्षाची सुरूवात करा हटके पद्धतीने! गर्दीपासून दूर असलेली भारतातील ‘ही’ ठिकाणे एकदा पाहाच

EPFO Provident Fund : घरबसल्या 1 मिनिटात तपासा आपला PF बॅलन्स! जाणून घ्या EPFO पासबुक पाहण्याचे सोपे, जलद मार्ग आणि नवीन सुविधा

जनावरांच्या बाजारात रिपोर्टिंग करत होती पत्रकार, बैलानं अचानक केला हल्ला; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT