Electric Car News Updates | TATA Nexon Catches Fire
Electric Car News Updates | TATA Nexon Catches Fire सकाळ
विज्ञान-तंत्र

Tata Nexon ही पेटली! स्कूटरनंतर आता इलेक्ट्रिक कारही धोकादायक?

सकाळ डिजिटल टीम

भारतात इलेक्ट्रिक कारला आग लागण्याची पहिली घटना समोर आली आहे. टाटाची लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणारी SUV Tata Nexon या इलेक्ट्रिक कारला आग लागली आहे. ही घटना 22 जून रोजी मुंबईच्या वसई पश्चिम (पंचवटी हॉटेलजवळ) ही घटना घडली. सध्या सोशल मीडियावर कारला आग लागल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (tata nexon ev catches massive fire in vasai west a mumbai suburb maharashtra video goes viral)

या घटनेबद्दल कंपनीनं प्रतिक्रिया दिली. कारला आग लागल्याची पहिली घटना घडल्यानंतर, कंपनीने एक निवेदन जारी केलंय. त्यात म्हटलं, या घटनेची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही सविस्तर तपास करत आहोत. त्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर तपशीलवार माहिती देऊ.आम्ही आमच्या वाहनांच्या आणि त्यांच्या वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत.

Tata Nexon EV ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. देशात दर महिन्याला किमान दोन ते तीन कारची विक्री होत आहे. कंपनीने आतापर्यंत 30,000 Nexon विकल्या आहेत.

या कारच्या मालकाने त्याच्या नेक्सॉन ईव्ही गाडीला त्याच्या ऑफिसमध्ये नेहमीच्या स्लो चार्जरने चार्ज केलं. घराच्या दिशेने जाताना सुमारे 5 किमी अंतर कापल्यानंतर कारमधून काही विचित्र आवाज ऐकू आले आणि डॅशबोर्डवर इशारा मिळाला. त्यानंतर त्यानं वाहन थांबवलं आणि कारमधून बाहेर पडला. त्यानंतर कारने अचानक पेट घेतला. आग आटोक्यात आणण्यासाठी नंतर अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं.

जवळपास चार वर्षांत देशभरात 30,000 हून अधिक वाहनांमध्ये ही पहिलीच घटना असल्याचे कंपनीने म्हटले आहे. देशात गेल्या काही दिवसांत अनेक इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागली आहे, ज्यामुळे सरकारने ओला इलेक्ट्रिक, प्युअर ईव्ही, जितेंद्र ईव्ही टेक, एथर एनर्जी आणि ओकिनावा सारख्या इलेक्ट्रिक कार निर्मात्या कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कारला आग लागल्याने हे .प्रकरण चांगलचं गाजतयं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

SCROLL FOR NEXT