Tata Punch iCNG Car eSakal
विज्ञान-तंत्र

Tata Punch CNG : टाटाचा प्रतिस्पर्धी कंपन्यांना 'पंच'! 10 लाखांच्या आत लाँच केली दमदार सीएनजी एसयूव्ही कार

Tata CNG SUV : ट्विन सिलिंडर टेक्नॉलॉजीसह लाँच केलेल्या या कारमध्ये मोठा लगेज स्पेस देण्यात आला आहे.

Sudesh

टाटा मोटर्सने सामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. परवडणाऱ्या दरात एक चांगली कार शोधणाऱ्यांसाठी टाटाने एक उत्तम पर्याय दिला आहे. कंपनीने शुक्रवारी आपली लोकप्रिय 'पंच' एसयूव्ही आता CNG रुपात लाँच केली आहे. विशेष म्हणजे याच्या बेस मॉडेलची किंमत 7.10 लाख, तर टॉप मॉडेलची किंमत 9.68 लाख रुपये (एक्स शोरूम) ठेवण्यात आली आहे.

टाटा पंच सीएनजीचे तीन व्हेरियंट कंपनीने लाँच केले आहेत. प्युअर, एडव्हेंचर आणि अकम्प्लिश्ड असे हे तीन व्हेरियंट असणार आहेत. ट्विन सिलिंडर टेक्नॉलॉजीसह लाँच केलेल्या या कारमध्ये मोठा लगेज स्पेस देण्यात आला आहे. यामुळे याची थेट स्पर्धा असंच तंत्रज्ञान वापरुन तयार केलेल्या ह्युंडाई एक्स्टरशी होणार आहे. (Tata Punch CNG)

काय आहे ट्विन सिलेंडर तंत्र?

Tata Punch CNG या कारचं सर्वात मोठं फीचर म्हणजे यातील ट्विन सिलिंडर टेक्नॉलॉजी. यात प्रत्येकी 30 लीटर क्षमतेचे दोन सिलिंडर देण्यात आले आहेत. हे सिलिंडर लगेच एरियाच्या खाली लावण्यात आल्यामुळे डिकीमध्ये 210 लीटर स्पेस उपलब्ध होते.

सेफ्टी फीचर्स

या कारमध्ये एक मायक्रो स्विच देण्यात आलं आहे, जे सीएनजी भरताना कारला बंद ठेवेल. यामुळे अशा वेळी होणाऱ्या दुर्घटना टळणार आहेत. सोबतच, पंच सीएनजी एसयूव्ही कारमध्ये थर्मल इन्सिडेंट प्रोटेक्शन फीचर देण्यात आलं आहे. यामुळे काही त्रुटी वा अडचण असल्यास कार आपोआप बंद होते आणि सिलिंडरमधून गॅस आपोआप निघून जातो.

कसं आहे इंजिन?

या एसयूव्हीमध्ये 1.2 L 3-Cylinder रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 86 hp मॅक्झिमम पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करतं. या सीएनजी व्हेरियंटमध्ये 5-Speed एएमटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

इतर फीचर्स

या कारमध्ये व्हॉइस असिस्टेड इलेक्ट्रिक सनरुफ, फ्रंट-सीट आर्मरेस्ट, यूएसबी सी टाईप चार्जर आणि शार्क फिन अँटीना देण्यात आला आहे. सोबतच ऑटोमॅटिक प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, 16-इंच डायमंड कट अलॉय व्हील, अँड्रॉईड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी असलेला 7-इंच इन्फोटेन्मेंट सिस्टीम, रेन सेन्सिंग वायपर, हाईट अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट असे अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. (Tata Punch iCNG Features)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT