e-Sign Tips  Sakal
विज्ञान-तंत्र

e-Sign Tips : मोबाईवरून PDF वर कारायची आहे e-Sign, फॉलो करा सोप्या ट्रिक्स

गेल्या काही वर्षांपासून मोबाईल आणि इंटरनेटचा वापर खूप वेगाने वाढला आहे.

सकाळ डिजिटल टीम

How To Do E Sign On PDF Through Mobile : गेल्या काही वर्षांपासून मोबाईल आणि इंटरनेटचा वापर खूप वेगाने वाढला आहे. त्यात आता भारतासह अनेक देशात डिजिटलायझेशनची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

हेही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

आज प्रत्येक कामासाठी इंटरनेट आणि डिजिटल माध्यमाचा वापर होत आहे. बँक किंवा विमा कार्यालयातील कामं, कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणे किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट, वाहन चालवणे यासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा लाभ घेणे आदी गोष्टींसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. यामुळे वेळेची बचत होण्याबरोबरच कामं लवकर होतात.

अनेकदा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आपल्यापैकी अनेकजण ऑनलाइन अर्ज करतो. त्यावेळी त्या अर्जावर सही करावी लागते. मात्र, अनेकांना ई-साइनिंग कशी करतात याबाबत माहिती नसते. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो. परंतु, आता काळजी करू नका किंवा गोंधळूनही जाऊ नका. कारण आज आम्ही तुम्हाला डिजिटल डॉक्युमेंट्सवर ई-साइन कशी करू शकाल त्यासाठी काय करावे यबद्दल माहिती सांगणार आहोत.

हे अ‍ॅप ठरेल उपयुक्त

तुम्हाला कोणत्याही पीडीएफ किंवा इतर कोणत्याही डॉक्युमेंट्सवर डिजिटल स्वाक्षरी करायची असेल, तर त्यासाठी तुमच्या स्मार्टफोनवर Adobe Acrobat Reader अ‍ॅप डाउनलोड करा. हे असे अ‍ॅप आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेली कोणतीही फाईल सहज उघडू शकता. विशेष म्हणजे हे अ‍ॅप पूर्णपणे विनामूल्य आहे. यात कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता तुमच्या मेल आयडीने लॉग इन करू शकता.

PDF वर कशी करावी ई-साइन

1. सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर Adobe Acrobat Reader अ‍ॅप डाउनलोड करा आणि ते इंस्टॉल करा.

2. नंतर त्यात अकाउंट ओपन करून लॉगिन करा.

3. यानंतर अ‍ॅप उघडून फाइलचा पर्याय निवडा.

4. आता ज्यावर स्वाक्षरी करायची ती फाईल शोधा.

5. यानंतर उजव्या बाजूला Edit पर्यायावर क्लिक करा.

6. Edit वर क्लिक करताच Fill आणि Sign असे पर्याय तुमच्या समोर येतील.

7. यानंतर उजव्या बाजूला Signature च्या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही स्वतःची सही करा.

8. सही केल्यानंतर तुम्हाला फाइल इन करावे लागेल.

9. यानंतर चेक मार्कवरील Ok पर्यायावर क्लिक करा.

10. वरील सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर तुमची ई-स्वाक्षरी प्रक्रिया पूर्ण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT