Portronics Technology esakal
विज्ञान-तंत्र

Portronics Technology : Portronics चा 10 मिनिटांच्या चार्जिंगवर 33 तासांसाठी चालणारा नेकबँड भारतात लाँच

पोर्ट्रोनिक्स हार्मोनिक्स Z5 नेकबँडमध्ये अखंड ऑडिओ अनुभवासाठी ब्लूटूथ v5.2 वायरलेस कनेक्टिव्हिटीची सोय

सकाळ डिजिटल टीम

Portronics Technology : Portronics ने भारतात नवीन Harmonix Z5 नेकबँड वायरलेस इयरफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने नेकबँड नवीन डिझाईनसह सादर केला असून तो 14.2 मिमी ड्रायव्हरने सुसज्ज आहे.

कंपनीचा दावा आहे की हे इयरफोन एका चार्जवर 33 तासांपर्यंत प्लेटाइम देऊ शकतात. नेकबँड कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ v5.2 वापरतात आणि USB टाइप-सी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.

पोर्ट्रोनिक्स हार्मोनिक्स Z5 नेकबँडमध्ये अखंड ऑडिओ अनुभवासाठी ब्लूटूथ v5.2 वायरलेस कनेक्टिव्हिटीची सोय आहे. हे Android आणि iOS डिव्हाइसेस दोघांसाठी सुसंगत आहे. हे इयरफोन्स सिरी, अॅमेझॉन अलेक्सा आणि गुगल असिस्टंट सारख्या व्हॉइस असिस्टंटना देखील सपोर्ट करतात.

इयरफोन्स तुम्हाला त्यांच्या ड्युअल EQ मोडमुळे बास मोड आणि म्युझिक मोडसह चांगले म्युझिक आउटपुट देतात. तुम्ही तुमच्या पसंतीच्या EQ मोडवर फक्त एका क्लिकवर स्विच करू शकता. हे नेकबँड आपल्याला आवाज कमी जास्त करणे, गाणी बदलणे, गाणी पॉज करणे आणि कॉल उचलणे किंवा कट करणे याचे कंट्रोल देते.

Portronics Harmonix Z5 मध्ये 250mAh ची बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की ते एका चार्जवर 33 तासांपर्यंत प्लेटाइम देते. कंपनीचे म्हणणे आहे की नेकबँड 10 मिनिटांच्या चार्जिंगवर 10 तासांपर्यंत बॅकअप देऊ शकतो. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे.

नवीन Portronics Harmonix Z5 नेकबँड स्टाईल इयरफोनची किंमत 2,499 रुपये आहे, परंतु ग्राहक सध्याच्या ऑफर मध्ये फक्त 849 रुपयांना खरेदी करू शकतात. कंपनीने हे इयरफोन ब्लॅक, ब्लू, रेड आणि पर्पल कलर ऑप्शनमध्ये काढले आहेत. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

SCROLL FOR NEXT