Technology Tips esakal
विज्ञान-तंत्र

Technology Tips : पृथ्वीसारखा दुसरा ग्रह, या ग्रहावर मिळेल २००० वर्षांचं आयुष्य

संशोधकांनी पृथ्वीसारख्याच एका बाह्यग्रहाचा शोध लावलाय

सकाळ डिजिटल टीम

Technology Tips : गेल्या काही वर्षांपासून जगभरातील वैज्ञानिकांनी त्यांच्या अंतराळ संशोधन क्षमतेत चांगलाच विकास केला आहे. आता त्याचे परिणामही त्यांना बघायला मिळत आहेत. संशोधकांनी पृथ्वीसारख्याच एका बाह्यग्रहाचा शोध लावलाय, ज्याचा आकार आणि स्थिती पूर्णपणे पृथ्वीसारखी आहे.

म्हणजे आपण कधी विचारच केला नसेल की सूर्यमालेच्या बाहेर पण एखादं जग असू शकतं. पण शास्त्रज्ञांनी सूर्यमालेच्या बाहेर असा ग्रह शोधून काढलाय, जो पृथ्वीसारखाच असल्याचं सांगितलं जातंय. आणि शक्यतो मानवी वस्तीसाठी देखील योग्य असल्याचं म्हटलं जातंय.

शास्त्रज्ञांनी या ग्रहाला वुल्फ 1069 बी असं नाव दिलंय. शास्त्रज्ञांनी सांगितलय की हा पृथ्वी एवढाच ग्रह आहे. इथे पृथ्वीसारखे जीवन शक्य आहे. कारण जगण्यासाठी हवा, पाणी आणि प्रकाश या गोष्टी आवश्यक असतात. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या तिन्ही गोष्टी वुल्फ 1069 बी ग्रहावर अस्तित्वात आहेत, त्यामुळे पर्यायी जीवनाचा शोध इथे पूर्ण होऊ शकतो.

हा वुल्फ 1069b कुठे आहे?

या ग्रहाच्या अनेक गोष्टी ऐकून तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकतात. उदाहरणार्थ, या ग्रहावर माणूस 2000 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो? दुसरा प्रश्न असा आहे की पृथ्वीशिवाय इतर ग्रहावर जीवन कसं शक्य आहे? आपले शास्त्रज्ञ इतर ग्रहांवरही जीवसृष्टीच्या शक्यतेच्या दिशेने अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत. शास्त्रज्ञांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, हा ग्रह आपल्या आकाशगंगेच्या उत्तरेकडे स्थित आहे. हा असा सहावा ग्रह आहे जो पृथ्वीसारखाच आहे.

२००० वर्षांचं आयुष्य..

आता २००० वर्षांचं रहस्यही समजून घ्या. वास्तविक, शास्त्रज्ञांच्या मते, इथे 16 दिवसांचं एक वर्ष आहे. समजा जर पृथ्वीवर एखाद्याचं वय ८०-८५ वर्षे असेल, तर त्याची तुलना या ग्रहावरील वर्षांसोबत केल्यास तुम्ही २००० वर्षे वयाचे ठरू शकता. अशाप्रकारे, जेव्हा माणूस या ग्रहावर राहायला सुरवात करेल, तेव्हा तेथील गणनानुसार लोक २००० वर्ष जगू शकतील.

या नव्या संशोधनाविषयी लेखिका डायना कोसाकोव्स्की म्हणतात, "तो पृथ्वीपेक्षा सूर्याच्या खूप जवळ आहे. आणि असं असूनही, या ग्रहावरील तापमान बुध ग्रहापेक्षा अधिक राहण्यायोग्य आहे. वुल्फ 1069b फार कमी रेडिएशन उत्सर्जित करतो. मात्र, तरीही येथील जीवन पृथ्वीसारखे साधं नाहीये.

वुल्फ 1069 बी विषयी थोड आणखीन जाणून घेऊ..

- हा ग्रह पृथ्वीपासून 31 प्रकाशवर्षांच्या अंतरावर आहे.

- त्याचा पृष्ठभाग थंड आहे आणि तो केशरी रंगाचा दिसतो.

- वुल्फ 1069 बी हे राहण्यायोग्य क्षेत्र आहे.

-पृथ्वीला मिळणाऱ्या सौऊर्जेचा सुमारे ६५% भाग या ग्रहाला मिळतो.

- याक्षणी या ग्रहावर खडक भरलेले आहेत.

-Wolf 1069 b च्या बहुतेक भागात दिवसच असतो.

- या ग्रहावर अशी डझनभर ठिकाणं आहेत, जिथे पाणी असण्याची शक्यता आहे.

- वुल्फ 1069 बी वर पाणी असल्याने येथे जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे.

- जगातील 50 अंतराळवीरांच्या गटाने या ग्रहाची पुष्टी केली आहे.

- त्याचा आकार पृथ्वीच्या जवळपास दुप्पट आहे.

-इथल्या आकाशातही तारे दिसतात, जे अगदी आपल्या पृथ्वीसारखे दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident in Kolhapur : कोल्हापुरात भीषण अपघात भरबाजारात घुसले वडाप, एका महिलेचा मृत्यू, दोन महिला गंभीर

Abhishek Sharma New Car : अभिषेक शर्माने घेतली नवी 'Ferrari Purosangue', किंमत अन् फिचर्स ऐकून डोळे पांढरे होतील...

Latest Marathi News Live Update : ATSच्या कारवाईत अटक झालेल्या तोसिफ शेखला मालेगाव न्यायालयात करण्यात आले हजर

US Visa Policy: गोंधळ ओसरला, मात्र धाकधूक कायम! अमेरिकेच्या ‘एच-वन-बी व्हिसा’बाबत आयटीयन्सची परिस्थिती

IND vs WI 2nd Test Live: शुभमन गिलने MS Dhoni ची परंपरा राखली... विजयाची ट्रॉफी बघा कोणाच्या हाती सोपवली; Video Viral

SCROLL FOR NEXT