Social Media Sakal
विज्ञान-तंत्र

Social Media: फेसबुक, इंस्टाग्राम नव्हे तर, तरूणींच्या फोटोने झाला होता सोशल मीडियाचा 'श्री गणेशा'

सध्या प्रत्येकजण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे. परंतु, जगातील सर्वात पहिली सोशल मीडिया वेबसाइट कोणती होती माहितीये का? याबाबत जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

The History of Social Media: सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर न करणारी क्वचितच एखादी व्यक्ती सापडते. स्मार्टफोन व इंटरनेट सहज सर्वांसाठी उपलब्ध असल्याने सोशल मीडियाचा वापर देखील वाढला आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामपासून ते टिकटॉकपर्यंत अनेक नवनवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यूजर्ससाठी उपलब्ध झाले आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात सुपरस्टार झालेल्यांची संख्या देखील कमी नाही. अनेकजण स्वतःच्या टॅलेंटच्या जोरावर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रिय झाले आहेत. मात्र, जगातील सर्वात पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणता होता माहितीये का? याविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

४ तरुणींचा फोटो केला होता पोस्ट

वर्ष १९८९ मध्ये स्विर्झलँडची प्रसिद्ध लॅब सर्नचे कॉम्प्युटर वैज्ञानिक सिल्वानो डे गेन्नारोने म्यूझिक फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. या फेस्टिव्हलमध्ये ४ मुलींनी भाग घेतला होता. या ४ तरुणींनी स्टेजवर गाणी देखील गायली होती. यावेळी एका फोटोग्राफरने अल्बमसाठी तरुणींचे फोटो काढले होते. सिल्वानो कॉम्प्युटरवर हे फोटो पाहत असतानाच त्यांचे मित्र व www ही संकल्पना मांडणाऱ्या बर्नर्स ली ने एक वेबसाइट बनविण्याचा सल्ला दिला.

लॅबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतःची माहिती शेअर करता येईल, या विचाराने साइट बनविण्याचा विचार बर्नर्स ली यांना आला होता. याच वेबसाइटवर गाणी गाणाऱ्या त्या तरुणींचा फोटो सर्वात प्रथम पोस्ट करण्यात आला. हीच इंटरनेट आणि सोशल मीडियावरील पहिली पोस्ट होती, असा दावा केला जातो.

जगातील पहिली सोशल मीडिया साइट

जगातील सर्वात पहिल्या सोशल मीडिया साइटबद्दल सांगायचे तर सिक्स डिग्रीजचे नाव सर्वात प्रथम येते. ही वर्ष १९९७ मध्ये सुरू झालेली ब्लॉगिंग साइट होती. यूजर या साइटवर फोटो अपलोड करू शकत होते. तसेच, यावर इतरांना फ्रेंड देखील बनवणे शक्य होते.

फेसबुकबद्दल सांगायचे तर मार्क झुकरबर्गने हॉवर्डच्या आपल्या मित्रांसोबत मिळून वर्ष २००४ मध्ये फेसबुक बनवले होते. वर्ष २००५ मध्ये युट्यूबची सुरुवात झाली. त्यानंतर एक वर्षातच मार्च २००६ मध्ये जॅक डॉर्सीने मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर सुरू केले. फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम हे वर्ष २०१० मध्ये लाँच झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर कोसळली वीज, थरारक दृष्य कॅमेरात कैद; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT