Sir Tim Berners Lee
Sir Tim Berners Lee  esakal
विज्ञान-तंत्र

आजच्याच दिवशी रचली गेली होती ‘World Wide Web’ची मुहूर्तमेढ

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

१९९० ला आजच्याच दिवशी जगात पहिल्यांदा wwwची यशस्वी चाचणी झाली होती त्या निमित्तानं सहज!

गोष्ट आहे १९८९ ची. एक ३५वर्षीय तरुण ‘सर्न’ या नावाने ओळखलं जाणाऱ्या ‘युरोपियन ऑर्गनायजेशन फॉर न्युक्लियर रिसर्च’(European Organization for Nuclear Research) या संस्थेत संशोधक सदस्य म्हणून काम करत होता. ‘एका संगणकातील माहिती दुसऱ्या संगणकात पाठवणे’ ही या तरुणावरची मुख्य जबाबदारी. या कामात भरपूर डोकेदुखी होत असल्याने काही तरी करून सगळी माहिती एकाच ठिकाणी कशी एकत्रित करता येईल या विवंचनेत हा तरुण तासनतास विचार आणि प्रयत्न करत बसायचा. यातूनच त्याने इम्फॉर्मेशन मॅनेजमेंट-अ प्रपोजल′ (Information Management-A Proposal) नावाची एक संशोधन पत्रिकाच तयार केली आणि यातूनंच जन्म झाला ‘वेब पेज ब्राऊजर’ (Web page browser) चा आणि पाठोपाठ आलं 'WWW' अर्थात वर्ल्ड वाईड वेब (World Wide Web). यामागे ज्याचा मेंदू होता त्या तरुणाचे नाव होते टिम बर्नर्स ली (Tim Berners Lee).

टिमचा जन्म ८जून १९५५ला इंग्लंडमध्ये झाला. ऑक्सफोर्ड विद्यापीठातील‘क्विन्स कॉलेज’मध्ये शिकत असताना मित्रासोबत हॅकिंग करताना पकडला गेल्याने शैक्षणिक कालावधीत त्याच्या संगणक वापरावर कॉलेज प्रशासनाने निर्बंध आणले होते. हल्ली आयुष्यात जरासं काही ‘नकारात्मक’ घडलं की लोकं नैराश्यात जातात-तथाकथित उच्चशिक्षित उच्चपदस्थ मंडळीही टोकाचे निर्णय घेतात पण खरं तर माणूस चुकू शकतोच. कुठलीही समस्या-अपयश हे शेवटचे नसते.

आजारपणामुळे लांबलेले शिक्षण-मंद म्हणणारे शिक्षक-प्रचंड वैचारिक गोंधळ हे सगळं बघता एडिसन तिथंच खचला असता तर? ‘मॅन ऑफ सेंच्युरी’ठरलेला आईन्स्टाईन स्विस फेडरल इन्स्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजीच्या प्रवेश परीक्षेत नापास झाल्यानंतर तिथंच अडकून पडला असता तर? सांगण्याचा मतितार्थ हाच की समस्येतच अनेकदा संधी दडलेली असते-कुठलंही अपयश शेवटचं नसते. टिमनंही त्याच्यावर झालेल्या कारवाईचा आपल्या पद्धतीने फायदाच करून घेतला. ‘संगणक’ वापरावर बंदी घालताय नो प्रॉब्लेम. घरातील टिव्ही-मोटोरोलाचा मायक्रोप्रोसेसर आणि सॉल्ड्रींग आयर्न. जुगाड जुळवत त्याने चक्क स्वत:चा संगणकच बनवून टाकला.

मोठमोठाली संशोधनं अशी काही एका दिवसात होत नाहीत, त्यांची पाळंमुळे ही अशी कुठंतरी रुजलेली असतात. १९८०ला ‘जिनिव्हा’इथल्या एका कार्यालयात काम करत असताना टिमने पहिल्यांदा हायपरटेक्स्टवर आधारित ‘ग्लोबल सिस्टिम’ची संकल्पना मांडली. यामुळे कुणीही बसल्या जागेवरून माहिती शेअर करू शकणार होते. यानंतर १९८९ला जी प्रसिद्ध संशोधन पत्रिका मांडली त्यात टिमने ‘हायपरटेक्स्ट आणि इंटरनेट’ यांना एकत्र जोडलं.

यामुळे ‘सर्न’ची कम्युनिकेशन सिस्टिम बळकट झाली. काम झालं-वाहवा झाली. पण सामान्य लोकं आणि लोकोत्तर माणसांत इथंच फरक असतो तो म्हणजे दृष्टिकोनाचा. आता “हे सगळं फक्त एकाच संस्थेसाठी का संकुचित ठेवावं? सगळ्या जगाने या प्रणालीचा वापर करायला हवा” या विचाराने टिमला पछाडले.

१९९०ला त्यानं हायपरटेक्स्टच्या माध्यमातून माहितीला वेगवेगळ्या पद्धतीच्या वेब केंद्रांना जोडून वापरावी असा प्रस्ताव ठेवला आणि त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १९९१ला त्यानं जगातील पहिलं संकेतस्थळ अर्थात वेबसाईट http://info.cern.ch लॉंच केली.

या वेबसाईटवर WWW म्हणजेच ‘वर्ल्ड वाईड वेब’च्या संपुर्ण संकल्पनेबाबत माहिती दिली होती. टिमच्या या सगळया प्रपंचामुळे कुणीही वापरकर्ता आता आपली स्वत:ची वेबसाईट सुरू शकत होता. HTML-URL-HTTP यासारख्या तांत्रिक बाबींचं मुलभूत लेखन करण्याचं श्रेयही टिमचंच. १९९२ ला इलिनॉईस विद्यापीठाने पहिलं वेब ब्राऊजर सादर केलं. एक ऑनलाइन ‘सर्च’ टूल जे वेबवरील उपलब्ध सगळया माहितीला ‘surfs’ करून मॅच शोधत निकालाची क्रमवारी लावते. जेव्हा कुणी वापरकर्ता एखादं वेब डॉक्युमेंट उघडतो तेव्हा तो यासाठी एका प्रकारचे ॲप्लिकेशन वापरतो ज्याला ‘वेब ब्राऊजर’ म्हणतात. जेव्हा एखाद्या वेब ब्राऊजरवर डोमेन किंवा URLचं नाव लिहिले जाते तेव्हा ब्राऊजर http च्या डोमेन ॲड्रेसला शोधण्याची विनंती पाठवतो कारण प्रत्येक डोमेनचा स्वतंत्र पत्ता असतो.

यानंतर ब्राऊजर डोमेन nameला सर्व्हर IP ॲड्रेसमध्ये परिवर्तित करतो, ज्याला WWW त्या सर्व्हरमध्ये शोधतो. जेव्हा ॲड्रेस आणि सर्व्हर ज्यात डोमेनला होस्ट केलंय चे मॅच होतात. तेव्हा सर्व्हर त्या पेजला ब्राऊजरकडे परत पाठवतो जे आपल्याला वेब ब्राऊजरवर सहजपणं दिसू शकते. १९९४ला टिमनं ‘मॅसाचुसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी’ इथं वर्ल्ड वाइड वेब कंसोर्टियमची स्थापना केली. ही ‘वर्ल्ड वाईड वेब’साठी काम करणारी आंतरराष्ट्रीय मानक संस्था म्हणून नावारुपास आली. या संस्थेचा उपयोग टिमनं वेबची देखरेख आणि या तंत्रज्ञानाच्या पुढिल प्रवासाच्या नियोजनासाठी केला.

शैक्षणिक कालावधीत ज्या उद्योगीपणामुळे टिमला शिक्षा झाली होती. तिच सवय त्यानं सकारात्मक आणि सर्जनशील पद्धतीनं वापरल्यानं टिम आता फक्त टिम बर्नर्स ली राहिला नाही ही वॉज नाऊ सर टिम ली बर्नर्स. २००४ ला सर टिम यांना नाईटहूड ही पदवी-कित्येक मानद डॉक्टरेट आणि २०१३ ला क्विन एलिझाबेथ पुरस्कार मिळाला. ‘टिम बर्नर्स ली’हे नाव या शतकातील पहिल्या काही महत्वाच्या लोकांच्या यादीतलं आघाडीचं नाव ठरले. गुगलच्या वेबसाईटवर एका सेकंदाला चाळीसेक हजार सर्च येतात पाठोपाठ युट्यूब आणि फेसबुकचा क्रमांक लागतो. आता तर लोकं इंटरनेट नाही तर इंटरनेट लोकांना चालवतंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : बायकोचा दिवाणा! पत्नी नांदायला आली नाही तर पुण्यात सात ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE : दुपारी तीन वाजेपर्यंतची आकडेवारी समोर; देशात 52.60 टक्के तर राज्यात 42.35 टक्के मतदान

Amit Shah: अमित शहांचा गुंतवणूकदारांना सल्ला; 4 जूनपूर्वी खरेदी करा, शेअर बाजारात तेजी येणार असल्याचा दावा

Anant Ambani's Vantara Team : जखमी हत्ती, ३५०० किमीचा प्रवास आणि २४ तास; अनंत अंबानीच्या टीमचं होतंय कौतूक

Rahul Gandhi : ''आता लग्न करावंच लागेल'' रायबरेलीत प्रचार करताना राहुल गांधी असं का बोलले?

SCROLL FOR NEXT