Side Effects Of Mobile  esakal
विज्ञान-तंत्र

Side Effects Of Mobile : मोबाईल प्रेमाने कमी झाला जिव्हाळा, व्यसन ठरतेय घातक

Side Effects Of Mobile : आयुष्यात कुटुंबातील सदस्यांपेक्षा मोबाईल अधिक जवळचा वाटू लागला आहे, जणू प्रत्येकाला मोबाईलचे व्यसन लागले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Side Effects Of Mobile : अलीकडे धावपळीमुळे निवांतपणा, विश्रांती, स्वतःसाठी वेळ काढणे हरवले आहे. स्पर्धेमुळे दगदग आणि ताणतणाव वाढले आहेत. पन्नाशीनंतर मधुमेह, उच्च रक्‍तदाब यासारखे आजार वाढलेत. मानसिक विकाराच्या विळख्यात चिमुकल्यांपासून तर प्रौढ अडकत चालले आहेत. परिणामी नैराश्‍य व विस्मरणाचे प्रमाण वाढत आहे. आयुष्यात कुटुंबातील सदस्यांपेक्षा मोबाईल अधिक जवळचा वाटू लागला आहे, जणू प्रत्येकाला मोबाईलचे व्यसन लागले आहे.

हातात मोबाईल घेऊन एकट्यानेच जगण्याचे दिवस आले आहेत. यामुळे आगामी दहा वर्षांत एकाकीपणाचे आजार अधिक गंभीर रुप धारण करतील. तासभर मोबाईल घेतला नाही, तर मन बैचन होते. ही अवस्था मोबाईलमुळे मिळालेल्या मानसिक आजाराचे निमंत्रण आहे.

मोबाईलच्या सवयीमुळे भविष्यात डोळ्यांपासून कानापर्यंत, मेंदू, कॅन्सरच्या विळख्यात शरीर सापडते, याचीही जाणीव ठेवण्याची गरज आहे. यामुळे मोबाईलपासून दूर राहावे असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रवीण नवखरे यांनी दिला.

मोबाईल नव्हता त्यावेळी लोक व्यस्त राहण्यासाठी मैदानी खेळ खेळायचे. पुस्तकांचे वाचन करण्यासाठी लायब्ररी संस्कृती होती. ती हरवली आहे. लेख लिहिणे, कविता करणे, नाटकात काम करणे, गाणी गाणे, नृत्य करणे, वृक्षारोपण करणे यांसारखे छंद जोपासण्यात येत असे. यामुळे त्यांचा मेंदू कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असायचा. आता मोबाईलने मानवी मेंदूवर आक्रमण करून ही संस्कृतीच उध्वस्त केली. यामुळेच मोबाईलमुळे मानसिक विकार वाढले आहेत.

-डॉ. प्रवीण नवखरे, मानसोपचार तज्ज्ञ,नागपूर.

भविष्यातील धोके

  • कमी ऐकू येणे,कान दुखणे.

  • कानात वेगवेगळे आवाज ऐकू येणे.

  • लक्षात न राहणे किंवा सतत काही विसरणे.

  • आळस येणे, चिडचिड करणे.

  • ब्रेन ट्यूमर होण्याची शक्‍यता.

  • कॅन्सरचा धोका.

  • डी जीवनसत्त्वाचा अभाव.

मोबाईलमुळे काय काय होते ...

  • ‘स्ट्रेस बर्न आऊट स्थिती निर्माण झाली.

  • झोपेची प्रक्रिया विस्कळित झाली.

  • विश्रांतीसाठीची पहिल्या चार तासांची झोप हरवली.

  • चालण्याचे, फिरण्याचे प्रमाण कमी झाले.

  • मोबाईलमुळे आळशीपणा आला.

  • पुस्तकी अभ्यासापासून दुरावले गेले.

  • मोबाईलने सुट्ट्यांचा आनंदही हिरावला

  • मैदानी खेळ हरवले

  • एकटेपणा वाढला

  • अस्थिर मनोवृत्तीमुळे आक्रमकपणा वाढला

मोबाईलच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी

  • कुटुंबात संवाद वाढवावा.

  • मुलांशी पालकांनी एकमेकांशी कुटुंबाबद्दल चर्चा करावी.

  • पालकांनी मुलांसोबत कॅरिअरसंदर्भात चर्चा करावी.

  • मुलांनी कुटुंबासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवावा.

  • व्यायामासह मैदानी खेळांकडे लक्ष द्यावे.

  • एखादा छंद जोपासावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT