Smartphone Google
विज्ञान-तंत्र

तुमचा स्मार्टफोन स्लो झालाय? 'या' ट्रिक्स वापरुन वाढेल स्पीड

सकाळ डिजिटल टीम

स्मार्टफोन जुना होतो त्यासोबत त्या स्मार्टफोनची स्पीड देखील कमी होत जाते. फोन काम करतो पण पहिल्या सारखी स्पीड मात्र मिळत नाही. जर असे तुमच्यासोबत देखील होत असेल आणि तुम्ही याला कंटाळून नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे, आज आपण अशा काही युक्त्या जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचा स्मार्टफोनची स्पीड वाढेल. त्यामुळे नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी या ट्रिक्स नक्की वापरुन बघा.

सिस्टम आणि अ‍ॅप अपडेट्स

स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर पॅकेज अपडेट करा, बऱ्याचदा अपडेट केल्याने स्मार्टफोनमध्ये असलेल्या त्रुटी दुरुस्त होतात आणि त्यामुळे तुमचा फोन पुर्वीपेक्षा व्यवस्थित चालू लागतो. स्मार्टफोन अपडेट करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा सेटिंग्ज वर जा आणि नंतर तिथून सिस्टीम अपडेट पर्याय निवडा आणि डॉनलोड अपडेट वर क्लिक करा. त्यानंच अपडेट्स इंस्टॉल करा.

त्यानंतर फोनमधील आउटडेटेड अॅप्स अपडेट करण्यासाठी सगळ्यात आधी गुगल प्ले स्टोअर वर जा, गुगल प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तेथे तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा. त्यानंतर उघडलेल्या ऑप्शन्समध्ये manage apps and device वर टॅप करा. या ठिकाणी दिसणाऱ्या आउटडेटेड अ‍ॅप्स दिसतील, ते सर्व अ‍ॅप्लिकेशन्स अपडेट करा.

अ‍ॅनिमेशन बंद करा

अनेक जुने स्मार्टफोन अँड्रॉइडचे अ‍ॅनिमेशन सहजासहजी हाताळू शकत नाहीत, त्यामुळे तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमधील अ‍ॅनिमेशन फीचर बंद करा. यासाठी तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जवर जा आणि नंतर About phone वर क्लिक करा. आणि येथे दिलेल्या Build Number वर सात वेळा टॅप करा यानंतर तुमच्या फोनमध्ये डेव्हलपर मोड चालू होईल त्यानंतर सेटिंग्ज मध्ये जाऊन सिस्टीम हा पर्याय निवडा. त्यामध्ये डेव्हलपर ऑप्शन्स वर जा आणि ड्रॉइंग सेक्शन पर्यंत खाली स्क्रोल करा आणि तिथे तुम्ही विंडो अ‍ॅनिमेशन स्केल मध्ये जेक अ‍ॅनिमेशन बंद करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance Tips: हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी तपासल्या नाहीत तर Claimच्या वेळी बसू शकतो मोठा धक्का!

IND vs WI: मॅचच्या काही तास आधी मोठं संकट! इकाना स्टेडियमजवळ गोमतीचं पाणी, अंडरपास जलमय; भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह?

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर कर्जतला पहाटे दाट धुक्याची चादर; आल्हाददायक वातावरणाने नागरिक सुखावले

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT