Mobile Data Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Tips: मोबाईल डेटा लवकर संपतो? फोनमधील 'ही' सेटिंग्स बदला, मिनिटात दूर होईल समस्या

स्मार्टफोनचा वापर न करताही मोबाइल डेटा संपतो, अशी अनेकांची तक्रार करत असते. विशेष म्हणजे काँग्रेस खासदाराने देखील संसदेत हा प्रश्न उपस्थित केला.

सकाळ डिजिटल टीम

Tips to save Mobile Data: स्मार्टफोनचा वापर न करताही मोबाइल डेटा संपतो, अशी अनेकांची तक्रार करत असते. विशेष म्हणजे काँग्रेस खासदाराने देखील संसदेत हा प्रश्न उपस्थित केला. तुमचा मोबाइल डेटा देखील लवकर संपत असल्यास काळजी करू नका. आम्ही तुम्हाला फोनमध्ये उपलब्ध असलेल्या एका फीचरविषयी सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही डेटाची बचत करू शकता.

आपण दिवस फोनचा वापर करत असतो. Instagram Reels आणि YouTube Short व्हीडिओमुळे देखील डेटा लवकर संपतो. अशावेळी हे फीचर तुमच्या खूपच उपयोगी येईल. या फीचरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

खूपच कामाचे आहे हे फीचर

अँड्राइड स्मार्टफोनमध्ये Data Saver Mode फीचर उपलब्ध आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही डेटाचा वापर कमी करू शकता. तुम्हाला सेटिंग्समध्ये एक छोटासा बदल करावा लागेल, ज्यामुळे डेटाचा जास्त वापर होणार नाही व तुमचा खर्चही वाचेल.

सेटिंग्समध्ये करा बदल

  • सर्वात प्रथम तुम्हाला अँड्राइड फोनच्या सेटिंग्समध्ये जावे लागेल.

  • येथे तुम्हाला SIM Card & Mobile Data चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

  • आता Data Usage या पर्यायावर जा.

  • येथे तुम्हाला Data Saving चा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.

  • त्यानंतर डेटा सेव्हिंग मोड ऑन करा.

फीचरचे तोटे

तुम्ही डेटा सेव्हिंग फीचरला सहज बंद देखील करू शकता. या फीचरचे जसे काही फायदे आहेत, तसे काही तोटे देखील आहेत. या फीचरमुळे बॅकग्राउंड अ‍ॅप्स काम करणे बंद करतात. मात्र, यामुळे ऑटो अपडेटिंग अ‍ॅप्स आणि मोठ्या फाइल डाउनलोड होणार नाहीत. यामुळे डेटा सेव्हिंग होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT