The World’s Most Visited Websites Esakal
विज्ञान-तंत्र

नेटकरी या साईटवर घालवतात अधिक वेळ; पॉर्नसाईट्सचा बोलबाला

The World’s Most Visited Websites: जगभरातील सर्वाधिक भेट दिलेल्या साईट्समध्ये टॉप 10 मध्ये गुगल शीर्षस्थानी असून या यादीत एका पॉर्न साईटचाही समावेश आहे.

सकाळ डिजिटल टीम

जगात सर्वाधिक शोधलेल्या वेबसाईट्स (The World’s Most Visited Websites):

सध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे. इंटरनेट (Internet) ही आजकाल मुलभूत गरज (basic need) बनली आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. सध्या लहान मुलापासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत सर्वच जण इंटरनेट वापरतात. कोरोना काळात तर इंटरनेटवरील लोकांचं अवलंबित्व आणखीच वाढले.

सिमिलर वेब (Similar Web) या संस्थेने जगभरातील इंटरनेट वापराबद्दलचा एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. यामध्ये नोव्हेंबर महिन्यात जगभरातील लोकांनी इंटरनेटवर भेट दिलेल्या (The World’s Most Visited Websites) टॉप 10 साईट्सची (Top 10) माहिती दिली आहे. जगभरातील एखाद्या साईटला लोकांनी कितीवेळा भेट दिली यावरून ही आकडेवारी बनवली आहे.

गुगल शीर्षस्थानी (Google at Top)-

आपण कुठलीही गोष्ट शोधण्यासाठी गुगल करतो. आणि या आकडेवरीही Google सर्च इंजिन जगभरातील टॉप टेन सर्वाधिक भेट दिलेल्या वेबपेजेसच्या सूचीत शीर्षस्थानी आहे. तब्बल 89.08 अब्जवेळा लोकांनी गुगलला भेट दिली. त्याखालोखाल लोकांनी YouTube आणि Facebook ला भेट दिली. युट्युबला 34 लाख वेळा लोकांनी भेट दिली तर फेसबुकला 20.61 अब्जवेळा लोकांनी भेट दिली. थोडक्यात गुगलवर येणाऱ्या लोकांची संख्या फेसबुकपेक्षा साधारणपणे 4.5 पट अधिक आहे. यावरूनच गुगलचं इंटरनेट विश्वातील निर्विदात वर्चस्व लक्षात येतं. त्यानंतर ट्विटरला (Twitter) 6.55 अब्जवेळा तर इंस्टाग्रामला (Instagram) 6.22 अब्जवेळा लोकांनी भेट दिली आहे.

चीनी आणि रशियन सर्च इंजिनचाही समावेश( Includes Chinese and Russian Search Engine)-

SimilarWeb च्या डिजिटल मापनानुसार, सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या वेबसाईट्समध्य चीनी शोध इंजिन baidu.com सहाव्या स्थानावर आहे. या साईटला नोव्हेंबरमध्ये 5.49 अब्ज लोकांनी भेट दिली होती. आठव्या स्थानावर yandex.ru या रशियन शोध इंजिनला (Russian Search Engine) 3.86 अब्ज लोकांनी भेट दिली. आणइ सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आर-रेट (R-rated site) केलेल्या साईटला, xvideos महिन्यासाठी 3.22 अब्ज दृश्यांसह 10 व्या क्रमांकावर राहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT