Mahindra XUV 700 Mahindra XUV 700
विज्ञान-तंत्र

या आहेत देशातील सर्वात सुरक्षित कार; मिळतील बेस्ट सेफ्टी फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्यापैकी बरेज जण कार खरेदी करण्याचा विचार करत असतील, दरम्यान कार खरेदी करत असताना त्याची किंमत आणि डिजाईन आणि मायलेजचा विचार केला जातो मात्र या सोबतच कारमध्ये देण्यात आलेल्या सेफ्टी फीचर्स देखील लक्षात घेण्याची गरज असते. भारतीय बाजारपेठेत अनेक कारचे मॉडल्स आहेत ज्यामध्ये ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार केला गेला आहे. टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा या देशांतर्गत कंपन्यांनी अशा कार सादर केल्या आहेत, ज्यांची सुरक्षा वैशिष्ट्ये टॉप क्लास आहेत आणि त्यांना अडल्ट आणि लहान मुलांच्या Global NCAP Car Crash Test मध्ये 5 आणि 4 स्टार सेफ्टी रेटींग मिळाली आहे.

देशातील टॉप पाच कार

भारतातील सर्वात सुरक्षित अललेल्या टॉप 20 कारच्या यादीबद्दल बोलायचे झाल्यास ग्लोबल एनसीएपी कार क्रॅश टेस्टमध्ये टाटा मोटर्स कंपनीची मायक्रो एसयूव्ही टाटा पंच सगळ्यात टॉपला आहे. या कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले असून ही भारतात बनवलेली सर्वात सुरक्षित कार म्हणून ओळखली जात आहे.

यानंतर महिंद्रा अँड महिंद्राची एसयूव्ही Mahindra XUV300 आहे, ज्याला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर टाटा मोटर्सची कूल हॅचबॅक Tata Altroz येते ज्याला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर देखील टाटा मोटार्सची एसयूव्ही Tata Nexon आहे, ज्याला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या चार फ्लॅगशिप कार आहेत ज्या भारतीय आहेत आणि सर्वात सुरक्षित मानल्या जातात. यानंतर, टॉप 20 सुरक्षित कारमध्ये, काहींना 4 सुरक्षा रेटिंग मिळाली, तर काहींना 3 किंवा 2 सुरक्षा रेटिंग मिळाली.

4 स्टार सेफ्टी रेटिंग

ग्लोबल एनसीएपी कार क्रॅश टेस्टमध्ये ज्या कारला 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली त्यामध्ये Mahindra Marazzo, Volkswagen Polo, Mahindra Thar, Tata Tiago, Tata Tigor, Maruti Suzuki Brezza, Renault Triber सारख्या हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही सेगमेंटमधील कार आहेत.

3 स्टार सेफ्टी रेटिंग

3 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेल्या कारमध्ये Ford Aspire आणि Ford Figo तसेच Maruti Ertiga, Renault Duster आणि Kia Seltos सारख्या कारचा समावेश आहे. यानंतर 2 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेल्या कारमध्ये लोकप्रिय हॅचबॅक कार आहेत जसे की, Maruti Swift, Hyundai Nios i10, Maruti Suzuki WagonR आणि Hyundai Santro. शेवटी 20 व्या क्रमांकावर Datsun Redi-Go ही आहे, ज्याला वन-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT