Top 5 Sedan Cars esakal
विज्ञान-तंत्र

Top 5 Sedan Cars : आता 8 लाखात खरेदी करा या सेडान कार्स

सध्या सेडान मार्केटमध्ये खूप कमी ऑफर्स सुरू

सकाळ डिजिटल टीम

Top 5 Sedan Cars : सध्या सेडान मार्केटमध्ये खूप कमी ऑफर्स सुरू आहेत, त्यामुळे जर तुम्ही सेडान खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट 8 लाख रुपये किंवा त्याहून कमी असेल, तर आम्ही तुमच्यासाठी असे पाच पर्याय घेऊन आलो आहोत, जे तुम्ही सहज खरेदी करू शकता.

Maruti Suzuki Dzire: सबकॉम्पॅक्ट डिझायरची किंमत 6.44 लाख ते 9.31 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान आहे. LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या चार ट्रिम लेव्हलमध्ये ही सेडान ऑफर केली जाते. यातल्या VXi आणि ZXi ट्रिम्स मध्ये फॅक्टरी-फिट CNG किट मिळू शकतो. यात 1.2-लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन ऑप्शन आहे. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह येते.

Honda Amaze: Honda India चे देशात सर्वात जास्त विकले जाणारे मॉडेल म्हणजे अमेझ. या सब-कॉम्पॅक्ट अमेझची किंमत 6.99 लाख ते 9.60 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान आहे. ही कार तीन ट्रिम लेव्हल मध्ये येते - E, S आणि VX. यात 1.2-लिटर पेट्रोल इंजिन ऑप्शन आहे जो 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा CVT गियरबॉक्स मध्ये येतो.

Hyundai Aura: Hyundai Aura ही देशातील आणखी एक लोकप्रिय सेडान आहे. या कारची किंमत 6.30 लाख ते 8.87 लाख रुपये आहे. या सब-कॉम्पॅक्ट सेडान मध्ये चार ट्रिम लेव्हल उपलब्ध आहेत - E, S आणि SX (O). S आणि SX ट्रिम मध्ये CNG-किट मिळतो.

Tata Tigor: टिगोर सेडान चार ट्रिम लेव्हलमध्ये येते - XE, XM, XZ आणि XZ+. ज्यापैकी फक्त XM, XZ आणि XZ+ ट्रिम मध्ये CNG किटमध्ये असू शकतो. बाकी सर्वच व्हेरीयंट मध्ये 1.2-लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन 5-स्पीड AMT किंवा 5-स्पीड MT चे ऑप्शन आहेत.

Maruti Suzuki Tour S: मारुती सुझुकी टूर एस ही परवडणारी सेडान आहे जी 6.51 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. यामध्ये तुम्हाला 1.2-लिटर इंजिन मिळेल. यासोबतच सेडानला सिंगल एअरबॅग, एअर कंडिशनर, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन मिळते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT