TRAI New Rule
TRAI New Rule eSakal
विज्ञान-तंत्र

TRAI Caller ID : आता फोन आल्यावर स्क्रीनवर दिसणार कॉल करणाऱ्याचं खरं नाव; लवकरच मिळू शकतं खास फीचर

Sudesh

TRAI Caller Name Presentation Service : एखाद्या अनोळखी नंबरवरुन कॉल आल्यानंतर, स्क्रीनवर नंबरसोबत त्याच व्यक्तीचं नावही दिसावं असा प्रस्ताव 'ट्राय'ने मांडला आहे. गेल्या काही काळात स्पॅम कॉल्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलं. या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास टेलिकॉम कंपन्यांना याबाबत निर्देश देण्यात येतील.

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. इंट्रोडक्शन ऑफ कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (CNP) असं नाव या सर्व्हिसला देण्यात आलं आहे. देशाच्या टेलिकॉम विभागाने (DoT) 2022 साली ट्राय आणि इतर संस्थांकडून सीएनपी बाबत सल्ले मागवले होते. हे सल्ले आल्यानंतर 2023 च्या मार्चमध्ये यावर खुली चर्चा करण्यात आली होती.

ट्रायचा अंतिम प्रस्ताव

या सर्व प्रक्रियेनंतर आता ट्रायने याबाबत आपला अंतिम प्रस्ताव सादर केला आहे. स्थानिक टेलिकम्युनिकेशन्स नेटवर्कमध्ये कॉलर आयडीचं फीचर (Caller ID Feature) हे बाय-डिफॉल्ट मिळायला हवं, असं ट्रायने म्हटलं आहे. अर्थात, ही एक ऑन-डिमांड सप्लिमेंटरी सर्व्हिस असू शकते, असंही ट्रायने स्पष्ट केलं. (TRAI New Rule)

म्हणजेच, एखाद्या ग्राहकाने ही सुविधा उपलब्ध करण्याची विनंती केली, तर त्या व्यक्तीला फोन आल्यानंतर कॉलरचं नाव स्क्रीनवर दिसेल. नवीन नंबर घेताना ग्राहकाने दिलेल्या ओळखपत्रावर जे नाव (Caller Name) असेल, तेच इतरांना स्क्रीनवर दिसणार आहे.

काय होणार फायदा?

एखाद्या अनोळखी नंबरवरुन फोन आल्यानंतर तो नंबर तपासण्यासाठी सध्या लोक ट्रुकॉलर किंवा तशाच अन्य अ‍ॅप्सची मदत घेतात. मात्र, यावर देखील खरं नावच मिळेल हे खात्रीने सांगता येत नाही. सीएनपी सुविधा सुरू झाल्यानंतर मात्र लोकांना अनोळखी नंबरवरचे कॉलही खऱ्या नावाने दिसणार आहेत. यामुळे फोन कॉलवरुन होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. सोबतच, स्पॅम कॉल्स, प्रमोशनल कॉल्स यांचा त्रासही कमी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar on Baramati Result: "बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य"; अजित पवारांची जाहीर कबुली

USA vs PAK : युएसएने पाकिस्तानचा निम्मा संघ शंभरच्या आत गुंडाळला; आफ्रिदीनं पार करून दिला 150 धावांचा टप्पा

Shooting World Cup : सरबज्योत सिंगचा सुवर्णवेध; जागतिक नेमबाजी स्पर्धेत बाजी

मोहोळच्या ज्येष्ठ नागरिकाला सोलापूरच्या रिक्षावाल्याने लुटले! कोंडीच्या पेट्रोल पंपावर नेऊन ‘फोन-पे’वरून काढले १.५ लाख रूपये

BJP Big Loss Five States: भाजपची 400 पारची घोषणा ठरली फेल! 'या' पाच राज्यांनी केला गेम

SCROLL FOR NEXT