twitter opens access to anti abuse tool for users know how it will work
twitter opens access to anti abuse tool for users know how it will work  
विज्ञान-तंत्र

Twitter वर ट्रोलर्सपासून मिळणार सुटका, येतय नवीन सेफ्टी फीचर

सकाळ डिजिटल टीम

ट्विटर (Twitter) वर चालणारी ट्रोलिंग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, यामुळे अनेक वापरकर्ते त्यांचे मत ट्विटरवर व्यक्त करणे टाळतात, दरम्यान ट्विटरने आता एक सेफ्टी मोड (Safety Mode) हे नवीन सेफ्टी टूल (Safety Tool) सादर केले आहे. त्यामुळे द्वेष पसरवणारे मेसेज (Hate Speech) आणि ट्रोलिंग(Trolling) च्या घटनांना आळा बसेल.

सध्या जगभरात लाखो ट्विटर वापरकर्ते हे नवीन सेफ्टी मोड वापरत आहेत. हे सेफ्टी मोड फीचर पहिल्यांदा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वापरकर्त्यांच्या छोट्या गटासाठी सादर करण्यात आले होते. पण आता बीटा वापरकर्त्यांसाठी सेफ्टी मोड टूल आणले गेले आहे. तसेच, यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड सारख्या इंग्रजी भाषिक देशांमध्ये नवीन सेफ्टी मोड वापरण्यासाठी उपलब्ध आहे.

कसे काम करेल

ट्विटरचा नवीन सेफ्टी मोड अशा ट्विटर अकाउंट्स शोधून काढेल, जे ट्विटरवर वाईट भाषा, द्वेषपूर्ण मजकूर आणि खोट्या बातम्या पसरवत आहे आणि असे सर्व ट्विटर अकाउंट पहिल्या 7 दिवसांसाठी ब्लॉक केली जातील. तसेच नेहमीच खोट्या बातम्या आणि द्वेषपूर्ण मजकूर पसरवणारे खाते जास्त काळासाठी ब्लॉक केले जाऊ शकते.

हे फीचर आल्यानंतर, ट्विट करणाऱ्या युजर्सच्या कंटेंटवर आणि रिप्लाय करणाऱ्या यूजर्सच्या कंटेंटवर नजर ठेवली जाईल. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने ट्विटरवर धोकादायक किंवा अनावश्यक कंटेट शेअर केला असेल, तर ट्विटर अकाउंट ऑटो ब्लॉक केले जाईल. असे ट्विटर खात्यांना इतरांना कधीच फॉलो करता येणार नाही.

तसेच, ते इतर कोणतेही खाते फॉलो करू शकणार नाहीत. याशिवाय अशा यूजर्सना डायरेक्ट मेसेज पाठवण्यावर देखील बंदी घालण्यात येणार आहे. सेफ्टी मोड कालावधी संपण्यापूर्वी, तुम्हाला तुमचे खाते पुन्हा सुरू करण्याविषयी माहिती देणारे नोटिफिकेशन मिळेल. ट्विटरचा सेफ्टी मोड तुमच्या ट्विटर खात्याच्या सेटिंग्ज ऑप्शनमध्ये असेल. जो कधीही चालू केला जाऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas War: ''मोदींच 'हे' करु शकतात, कारण ते ग्लोबल लिडर आहेत'', पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांचं पत्र

T20 WC 24 Super 8 : सुपर-8ची शर्यत रोमांच मोडवर! 20 पैकी 11 संघांचा पत्ता कट; आता एका जागेसाठी दोन टीममध्ये टक्कर

Ganga Dussehra 2024: गंगा दशहराला काय करावे अन् काय नाही? वाचा एका क्लिकवर

Ravindra Waikar : ज्या मोबाईलवरुन EVM अनलॉक केलं, तोच मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याला दिला; धक्कादायक प्रकार उघड

Latest Marathi News Live Update : तुर्भे एमआयडीसी परिसरात पाण्यात बुडून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT