Twitter  Sakal
विज्ञान-तंत्र

Twitter India layoffs : मस्कने भारतातील 'या' कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी ट्वीटरची सूत्र हातात घेताच कर्मचारी कपातीची तलवार उपसली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Twitter Sacking Indian Employees : टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी ट्वीटरची सूत्र हातात घेताच कर्मचारी कपातीची तलवार उपसली आहे. आज अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आल्याचे ईमेलदेखील मिळण्यास सुरूवात झाली आहे. या कपातीअंतर्गत ट्वीटरने भारतातील काही कर्मचाऱ्यांना नोकरीरून काढून टाण्यात आल्याचे मेल पाठवले आहेत.

दरम्यान, कर्मचारी कपातीअंतर्गत ट्वीटरने भारतातील मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि काही अन्य विभागांमधील कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत एएनआयने ट्वीटदेखील केले आहे.

"ऑफिसला येत असाल तर घरी परत जा"

कर्मचारी कपातीचे मेल पाठवण्यापूर्वी मस्ककडून कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवण्यात आला होता. त्यामध्ये ऑफिसला येत असाल तर घरी परत जा आणि मेलची वाट पाहा, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता जगभरातील कर्मचाऱ्यांना टर्मिनेशनचे ईमेल मिळण्यास सुरूवात झाली आहे.

ई-मेलमध्ये नेमकं काय?

"Twitter ला आणखी कार्यक्षण करण्याच्या प्रयत्नात, आम्ही शुक्रवारी जागतिक पातळीवर कर्मचारी कमी करण्याच्या कठीण प्रक्रियेतून जाऊ. आम्हाला माहित आहे की याचा परिणाम अनेक व्‍यक्‍तींवर होईल ज्यांनी Twitter वर अमूल्य योगदान दिले आहे, परंतु कंपनीचे यश पुढे जाण्‍यासाठी ही कृती दुर्दैवाने आवश्‍यक आहे. आमच्या कर्मचार्‍यांचे स्वरूप आणि प्रभावित व्यक्तींना शक्य तितक्या लवकर माहिती देण्याची आमची इच्छा लक्षात घेता, ही प्रक्रिया मेलद्वारे पार पडेल. शुक्रवार 4 नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पर्यंत, प्रत्येकाला वैयक्तिक ईमेल मिळेल".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh :  कर विभागात फील्डवर ‘अशा’ अधिकाऱ्यांचीच करा भरती; CM योगी आदित्यनाथ यांनी दिले कडक आदेश

Uttrakhand : उत्तराखंडची ही ठिकाणं पहाल तर स्वित्झर्लंड विसरून जाल; हे पाच सुंदर लोकेशन्स एकदा पहायलाच हवेत

Crime News : जळगाव-अजिंठा रोडवर गोळीबार: कुसुंबा गावात ८ ते १० जणांच्या टोळक्याची दहशत; दुचाकी दगडांनी ठेचली

Malegaon Nagarpanchyat Election : माळेगाव नगराध्यक्ष पदाचा पहिला मान ओबीसी महिलेला

Santosh Deshmukh Case: ''आरोपींच्या विरोधात शब्दही न बोलणारे लोकप्रतिनिधी...'', धनंजय देशमुखांचा मुंडेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT