Twitter Shadow Banning  esakal
विज्ञान-तंत्र

Twitter Shadow Banning : ट्विटरच्या या अफवेवर एलोन मस्कचा शिक्का मोर्तब! ब्लॅक लिस्टमध्ये अनेकांसोबत डॉ. जय भट्टाचर्यांचे नाव

शॅडो बँनिंग म्हणजे एखाद्या युजरला पूर्णपणे बँन न करता त्याच्या काही पोस्टल ब्लॉक करणं

सकाळ डिजिटल टीम

Twitter Shadow Banning : शॅडो बँनिंग बद्दल आता खूप चर्चा होते आहे; याआधीही इंस्टाग्रामने शॅडो बँनिंगची प्रक्रिया सुरू केली आहे. आता ट्विटरही असे काही करणार आहे का याबद्दल युजर्समध्ये चर्चा सुरू आहे. ट्विटर आपल सॉफ्टवेअर अपडेट करून खोटी अफवा पसरवणाऱ्या अकाउंट्सला शॅडो बँन करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करतं असल्याची माहिती एलोन मस्क यांनी देऊन या अफवेवर शिक्का मोर्तब केला आहे.

नक्की काय आहे शॅडो बँनिंग

शॅडो बँनिंग म्हणजे एखाद्या युजरला पूर्णपणे बँन न करता त्याच्या काही पोस्टला ब्लॉक करणं किंवा एखाद्याने सर्च केल्यानंतर त्या युजरला न दाखवणं किंवा त्याच्या पोस्ट न दाखवणं अस. ब्लॉक केलं की तुम्ही ट्विटरवर काहीही करू शकत नाही यालाच दुसरा पर्याय म्हणजे शॅडो बँनिंग.

या आधीही परसली होती ही अफवा

2018 मध्येही एकदा शॅडो बँनिंगबद्दलची अफवा पसरवली होती पण तेव्हा, ट्विटरचे एक्झिक्युटिव्ह विजया गड्डे आणि कायव्हॉन बेकपौर यांनी तेव्हा ट्विटर असं काहीही करत नसल्याची पुष्टी केली होती.

मस्क यांनी सांगितल की ट्विटरचे एम्प्लॉइ अशा लोकांची लिस्ट काढता आहेत. ज्या युजर्सला बॅन करण्यात येणार आहे अशांना तसा सविस्तर मेसेज त्यांना जाईल आणि त्याच कारणही त्यात स्पष्ट केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे.

याबाबत अधिक बोलतांना लोकांनी ट्विट केले आहे की फ्रीडम ऑफ स्पीच चे भान ठेवत युजर्सला आपली मतं मांडण्याचा हक्क आहे, पण त्याला ट्रेंडिंग करावे की नाही याबद्दलचा निर्णय ट्विटरवरून घेतला जाईल. ही ब्लॅक लिस्ट अद्याप स्पष्ट झाली नसली तरी त्यात कोविड मध्ये मुलांच्या शिक्षणाच्या बाजूने बोलणाऱ्या डॉ. जय भट्टाचर्य यांनाही या लिस्ट मध्ये ठेवल्याचं म्हटलं जातं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT